वन्यप्राणी प्रकरणी राज्यमंत्री यड्रावकर यांनी दिल्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:00 IST2021-02-05T07:00:15+5:302021-02-05T07:00:15+5:30
दतवाड : दत्तवाड (ता. शिरोळ) येथील परिसरामध्ये बिबट्यासदृश वन्यप्राणी आढळल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. या ...

वन्यप्राणी प्रकरणी राज्यमंत्री यड्रावकर यांनी दिल्या सूचना
दतवाड : दत्तवाड (ता. शिरोळ) येथील परिसरामध्ये बिबट्यासदृश वन्यप्राणी आढळल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी भेट देऊन ग्रामस्थांची संवाद साधला व वनअधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
वनविभागाने ट्रॅप कॅमेरे बसवून वन्यप्राण्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. वनविभागाचे पंधरा अधिकारी व कर्मचारी शोध घेत आहेत. सोमवारी मंत्री यड्रावकर यांनी याठिकाणी भेट देऊन घटनेची माहिती घेतली व ग्रामस्थांना सतर्क राहण्याबाबत सांगितले.
यावेळी डी. एन. सिदनाळे, बबन चौगुले, नूर काले, आदिनाथ हेमगिरे, दौलत माने, सुकुमार सिदनाळे, चंद्रकांत कांबळे, ए. सी. पाटील, प्रभू चौगुले, नाना नेजे, अशोक पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो - ०१०२२०२१-जेएवाय-०७
फोटो ओळ - दत्तवाड (ता. शिरोळ) येथे आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी भेट देऊन ग्रामस्थांना सतर्क राहण्याबाबतचे आवाहन केले.