पदवीचे वर्ग सुरू करण्याबाबत महाविद्यालयांना सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 10:59 AM2021-02-12T10:59:05+5:302021-02-12T11:00:12+5:30

Shivaji University kolhapur : विविध अधिविभाग आणि कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील संलग्नित महाविद्यालयांमधील पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे वर्ग सोमवारपासून (दि. १५) नियमित भरविण्यात यावेत, अशी सूचना शिवाजी विद्यापीठाने गुरूवारी दिली. त्याबाबतचे ई-मेल विद्यापीठ प्रशासनाने अधिविभाग, महाविद्यालयांना पाठविले आहेत.

Instructions to colleges for starting degree classes | पदवीचे वर्ग सुरू करण्याबाबत महाविद्यालयांना सूचना

पदवीचे वर्ग सुरू करण्याबाबत महाविद्यालयांना सूचना

Next
ठळक मुद्देपदवीचे वर्ग सुरू करण्याबाबत महाविद्यालयांना सूचनावसतिगृहे सुरू करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे तयार करा

कोल्हापूर : विविध अधिविभाग आणि कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील संलग्नित महाविद्यालयांमधील पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे वर्ग सोमवारपासून (दि. १५) नियमित भरविण्यात यावेत, अशी सूचना शिवाजी विद्यापीठाने गुरूवारी दिली. त्याबाबतचे ई-मेल विद्यापीठ प्रशासनाने अधिविभाग, महाविद्यालयांना पाठविले आहेत.

महाविद्यालयांमध्ये वर्ग भरविण्याबाबत शासन आदेशानुसार कार्यवाही करण्यासाठी विद्यापीठाने विद्या परिषद, व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेतली. त्यानंतर वर्ग भरविण्याबाबतच्या विविध सूचना या ई-मेलव्दारे केल्या आहेत. त्यामध्ये वसतिगृहे सुरू करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे तयार करावीत.

विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार ऑफलाईन, ऑनलाईन परीक्षा घेणे, वर्गातील उपस्थितीबाबत विद्यार्थ्यांना सक्ती करण्यात येऊ नये, वसतिगृहे आणि महाविद्यालयांचे इलेक्ट्रिक आणि सेफ्टी ऑडिट करून घेणे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची कोरोना तपासणी करण्याबाबत प्रशासनासमवेत चर्चा करणे, आदी सूचनांचा समावेश आहे.

विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) आणि विद्यापीठाने नेमलेल्या प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे समितीच्या शिफारशींची माहिती अधिविभाग, महाविद्यालयांना पाठविण्यात आली आहे.

Web Title: Instructions to colleges for starting degree classes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.