घोसरवाड वृद्धाश्रमात विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींची प्रतिष्ठापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:17 IST2021-07-21T04:17:49+5:302021-07-21T04:17:49+5:30
कुरुंदवाड : घोसरवाड (ता. शिरोळ) येथील जानकी वृद्धाश्रमात आषाढी एकादशीनिमित्ताने विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन ...

घोसरवाड वृद्धाश्रमात विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींची प्रतिष्ठापना
कुरुंदवाड : घोसरवाड (ता. शिरोळ) येथील जानकी वृद्धाश्रमात आषाढी एकादशीनिमित्ताने विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
वृद्धाश्रमातील वृद्धांना धार्मिक वातावरणात मन रमता यावे, यासाठी वृद्धाश्रमात विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय वृद्धाश्रम चालक बाबासाहेब पुजारी यांनी घेतला होता. दरम्यान, मंगळवारी सकाळी शंकर कोळी व चंद्राबाई कोळी या दांपत्याच्या हस्ते मंदिराच्या ठिकाणी विधिवत पूजा करण्यात आली.
सर्वोदय फाउंडेशनचे अध्यक्ष सुरेंद्र पाटील यांच्या हस्ते मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. अध्यक्षस्थानी सरपंच साहेबराव साबळे होते. यावेळी दगडू माने, उपसरपंच मयूर खोत, बाबासोा पुजारी, शिवगोंडा पाटील, बंडा परीट, सुरेश कोळी, शिवाजी एडवान, राजू मिसाळ यांच्यासह वारकरी उपस्थित होते. दुपारी भजनाचा कार्यक्रम पार पडला तर सायंकाळी ह. भ. प. आबाबालाल नदाफ यांचा प्रवचनाचा कार्यक्रम झाला.
फोटो - २००७२०२१-जेएवाय-०४
फोटो ओळ - घोसरवाड (ता. शिरोळ) येथे जानकी वृद्धाश्रमात विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी सुरेंद्र पाटील, सरपंच साहेबराव साबळे, बाबासाहेब पुजारी उपस्थित होते.