कुरुंदवाडमध्ये पाच मशिदीत गणेशाची प्रतिष्ठापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:22 IST2021-09-13T04:22:29+5:302021-09-13T04:22:29+5:30
कुरुंदवाड : शहरातील पाच मशिदीत गणेशमूर्ती प्रतिष्ठापना करून नव्या पिढीनेही जातीय सलोख्याची परंपरा आजही कायम राखली आहे. शहरातील हिंदू-मुस्लीम ...

कुरुंदवाडमध्ये पाच मशिदीत गणेशाची प्रतिष्ठापना
कुरुंदवाड : शहरातील पाच मशिदीत गणेशमूर्ती प्रतिष्ठापना करून नव्या पिढीनेही जातीय सलोख्याची परंपरा आजही कायम राखली आहे.
शहरातील हिंदू-मुस्लीम ऐक्य अधिक वृद्धिंगत होण्यासाठी शहरातील हिंदू, मुस्लीम समाजातील बुजुर्ग लोकांनी १९८२ साली मशिदीत गणेशमूर्ती प्रतिष्ठापना करण्यास सुरुवात केली. या बुजुर्ग मंडळीतील अनेकजण हयात नसलेतरी त्यांनी सुरू केलेल्या या परंपरेला चाळीस वर्षे झाली आहेत. तरी नव्या पिढीने ही परंपरा आजही कायम राखली आहे. त्यामध्ये शेळके मशीद, कारखाना मशीद, बैरागदार मशीद, कुडेखान मशीद व ढेपणपूर मशीद अशा एकूण पाच मशिदीत गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. हिंदू, मुस्लीम बांधव मोठ्या भक्तिभावाने एकत्रित गणेशोत्सव काळात पूजाअर्चा करून संपूर्ण देशाला जातीय सलोख्याचे आदर्श घालून दिला आहे.
फोटो - १२०९२०२१-जेएवाय-०३
फोटो ओळ - कुरुंदवाड शहरातील सन्मित्र चौकात बैरागदार मशिदीत गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.