शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील अखेर मासुर्लीच्या त्या त्रस्त वृद्धेला भेटलेच नाहीत...कार्यालयात ठिय्या, पुतण्याने हडप केलेली जमीन, घर परत द्या;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 00:07 IST

कोल्हापूर : मासुर्ली (ता. खटाव, जि. सातारा) येथील पुतण्याने हडप केलेली जमीन व घर परत मिळावे, या आशेपोटी वृद्धेने बुधवारी दिवसभर विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात ठिय्या मांडला. दिवसभर उपाशीपोटी बसलेल्या या वृद्धेची अखेर विश्वास नांगरे-पाटील यांची भेट झाली नाही. रात्री उशिरा नांगरे-पाटील यांच्या सहायकाने ‘त्या’ वृद्धेची भेट घेऊन निवेदन ठेवून ...

कोल्हापूर : मासुर्ली (ता. खटाव, जि. सातारा) येथील पुतण्याने हडप केलेली जमीन व घर परत मिळावे, या आशेपोटी वृद्धेने बुधवारी दिवसभर विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात ठिय्या मांडला. दिवसभर उपाशीपोटी बसलेल्या या वृद्धेची अखेर विश्वास नांगरे-पाटील यांची भेट झाली नाही. रात्री उशिरा नांगरे-पाटील यांच्या सहायकाने ‘त्या’ वृद्धेची भेट घेऊन निवेदन ठेवून घेतले.

अधिक माहिती अशी, सोनाबाई जयसिंग माने (वय ८०) यांच्या पतीचे निधन झाले आहे. त्यांना तीन विवाहित मुली आहेत. त्या मासुर्ली येथे एकट्याच राहतात. दोन महिन्यांपूर्वी पुतण्या सर्जेराव निवृत्ती माने याने त्यांची जमीन व घर हडप केले आहे. त्यांना घरातून हाकलून दिले. निवारा नाही की कोणाचा आधार नाही, या मानसिकतेत खचलेल्या सोनाबाई यांनी आठवड्यापूर्वी कोल्हापुरात नांगरे-पाटील यांची भेट घेतली. त्यांनी स्थावर मालमत्तेची कागदपत्रे घेऊन भेटण्यास सांगितले. त्यानुसार बुधवारी दुपारी एकच्या सुमारास त्या विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात आल्या. या ठिकाणी त्यांनी नांगरे-पाटील यांना भेटण्यासाठी आल्याचे पोलिसांना सांगितले. पण पोलिसांनी साहेब बैठकीमध्ये असल्याचे सांगून वृद्धेकडे दुर्लक्ष केले.

सोनाबाई कार्यालयाबाहेर दिवसभर नांगरे-पाटील यांची भेट घेण्यासाठी बसून राहिल्या. दिवसभरात परिक्षेत्रातील पोलीस अधिकाºयांच्या तीन बैठका झाल्याने कोणालाच नांगरे-पाटील यांना भेटता आले नाही. सायंकाळी सहाच्या सुमारास नांगरे-पाटील निघून गेले.अ‍ॅड. चारूलता चव्हाण यांची माणुसकी...कार्यालयातील कर्मचारी घरी जात असताना त्यांना सोनाबाई कार्यालयाबाहेर बसल्याचे दिसले. या प्रकाराची माहिती अ‍ॅड. चारूलता चव्हाण यांना समजली. त्यांनी तत्काळ महानिरीक्षक कार्यालयाबाहेर येऊन सोनाबार्इंची भेट घेतली. त्यानंतर अधिकाºयांशी फोनवर संपर्क साधून विचारपूस केली. काही वेळाने नांगरे-पाटील यांच्या सहायकांनी सोनाबार्इंची भेट घेऊन चर्चा केली. त्यांच्याकडील निवेदन व काही कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रतीही घेतल्या. त्या दिवसभर उपाशी असल्याने त्यांना पाणी, वडापाव व चहाही दिला. आपणाला नांगरे-पाटील यांना भेटूनच जायचे असल्याचे त्यांनी सहायकास सांगितले. त्यानुसार आज, गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास त्यांची भेट करून देण्याचे सहायकाने मान्य केले.

 

टॅग्स :police commissioner office Nagpurपोलीस आयुक्त कार्यालयkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस