शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: अणदुरातील फार्महाऊस, रिसॉर्टची तपासणी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 18:15 IST

पाणी संचय पातळीतील बांधकामे तातडीने हटवण्याच्या सूचना

कोल्हापूर : पाटबंधारे विभागाने जलाशयांच्या शेजारी असलेले फार्महाऊस, रिसॉर्ट आणि हॉटेल्सची तपासणी सुरू केली. अणदूर धरण परिसरातील ४० फार्महाऊसची तपासणी पूर्ण झाली असून, यात चार ठिकाणी पाणी संचय पातळीलगत अनधिकृत बांधकामे केल्याचे आढळले. बेकायदेशीर बांधकामे तातडीने काढण्याच्या सूचना त्यांना दिल्या आहेत. तसेच जलाशयात बोट आणि तराफे फिरवणाऱ्या फार्महाऊस धारकांना अधिकाऱ्यांनी कारवाईचा इशारा दिला आहे.जिल्ह्यातील धरणे आणि तलावांच्या शेजारी वाढलेले अतिक्रमण, जलाशयांच्या सुरक्षेवर 'लोकमत'ने प्रश्न उपस्थित करताच पाटबंधारे विभागाने सर्व जलाशयांशेजारी असलेले हॉटेल्स, फार्महाऊस मालकांना नोटिसा पाठवल्या होत्या. त्यानंतर तातडीने बांधकामांची तपासणी सुरू केली आहे. पाटबंधारे विभागाच्या कळे येथील शाखा अभियंत्यांनी अणदूर येथील ४० फार्महाऊसची तपासणी केली.बांधकामाला परवानगी घेतली आहे काय? सांडपणी आणि कचऱ्याचे काय नियोजन केले आहे? पाणलोट क्षेत्राची नासधूस केली आहे काय? जलाशयातून पाणी उपसा करण्याची परवानगी घेतली आहे काय? पाटबंधारे विभागाच्या हद्दीत बांधकामे केली आहेत काय? याची तपासणी अभियंता अजिंक्य पाटील यांच्या पथकाने केली. जिल्ह्यातील सर्वच धरणे आणि तलावांशेजारी असलेल्या बांधकामांची चौकशी आठवडाभरात पूर्ण होईल, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

चार ठिकाणी अनधिकृत बांधकामेअणदूर धरणालगत पाणी संचय पातळीमध्ये चार ठिकाणी बोटी लावण्यासाठी बांधकाम केल्याचे तपासणीत निदर्शनास आले. याबाबत फार्महाऊस मालकांना विचारणा केली असता, त्यांनी संबंधित बांधकाम आपले नसल्याचे सांगून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्यात उतरण्याची परवानगी नसताना बोटी कशासाठी घेतल्या आहेत? अशी विचारणा करताच ते अनुत्तरीत झाले.

सूचना फलक लावणारधरणांमध्ये बोटिंग करण्यास परवानगी नसल्याचे आणि निषिद्ध क्षेत्राचे सूचना फलक पाटबंधारे विभागाने तयार केले आहेत. चार दिवसांत कळे विभागातील सर्व जलाशयांवर सूचना फलक लावणार असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.पोलिसांना गस्त घालण्याचे आवाहनअणदूर धरणात एक पर्यटक बुडून दुर्घटना झाल्यानंतरही जलाशयांवर पर्यटकांची गर्दी वाढतच आहे. पुन्हा दुर्घटना घडू नयेत, यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी. सुट्यांच्या काळात नियमित गस्त ठेवावी, असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDamधरणtourismपर्यटन