शहरं
Join us  
Trending Stories
1
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
4
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
5
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
6
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
7
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
8
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
9
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
10
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
11
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
12
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
13
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
15
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
16
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
17
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
18
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
19
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
20
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल

पन्हाळगडावरील पडझडीची तज्ञ अभियंत्यांकडून पाहणी, जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने अहवाल देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 18:41 IST

आर्किटेक्ट अँन्ड इंजिनियर असोसिएशन, जिओलॉजिस्ट, नगरपरिषद, पुरातत्व विभाग, सार्वजनिक बांधकाम यांच्यावतीने ऐतिहासिक वास्तुंची आणि तटबंदीची पाहणी करण्यात आली.

पन्हाळा : ऐतिहासिक पन्हाळगडावरील बुरुज ढासळल्याच्या घटना काही दिवसापुर्वीच समोर आल्या आहेत. यानंतर दुर्गप्रेमींनी याप्रश्नी आवाज उठवला होता. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय पुरातत्व विभागाला पत्र लिहून याप्रश्नी लक्ष देण्याची विनंती केली होती. यानंतर आज, बुधवारी आर्किटेक्ट अँन्ड इंजिनियर असोसिएशन, जिओलॉजिस्ट, नगरपरिषद, पुरातत्व विभाग, सार्वजनिक बांधकाम यांच्यावतीने पन्हाळा नाका ते पुसाटी बुरुज मार्गे, सज्जाकोठी पर्यंत ऐतिहासिक वास्तुंची आणि तटबंदीची पाहणी करण्यात आली.      असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणेंनी सांगितले की, पन्हाळ्यातील ऐतिहासिक वास्तू व तटबंदीची पडझड रोखण्यासाठीचा अहवाल येत्या गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहोत. या ऐतिहासिक वास्तुंचे नेमके कोणत्या पद्धतीने संरक्षण करता येइल याला प्राधान्य देणार आहे व त्यासाठी नेमके काय करावे लागेल याची बैठकीत चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.संपुर्ण आराखडा बनवून असोसिएशन नगरपरिषदेकडे व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करुन पुरातत्व खात्याची परवानगी घेवुन पुढील कामकाज केले जाणार असल्याचे जिओलॉजिस्ट बाबा जगताप यांनी सांगितले.ऐतिहासिक वास्तू पाहणीसाठी संवर्धन तज्ञ चेतन रायकर, जिओलाॕजिस्ट बाबा जगताप, डॉ. नवघरे, जे. डी. पाटील, श्रीकांत शिंदे, पुरातत्व चे विजय चव्हाण, आर्किटेक्ट असोसिएशनचे अजय कोराणे, प्रशांत हाडकर, अंजली जाधव, सार्वजनिक बांधकामचे धनंजय भोसले, काटकर हे सर्व अभियंते हजर होते. तर माजी नगराध्यक्ष असीफ मोकाशी, माजी उपनगराध्यक्ष रविंद्र धडेल, चंद्रकांत गवंडी हे हजर होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFortगड