शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराची पुरातत्वच्या संचालकांकडून पाहणी, लवकरच सुधारणा होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 13:58 IST

मंदिराच्या मूळ रूपाचे जतन संवर्धन व अन्य डागडुजीसंदर्भात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने काही दिवसांपूर्वी सविस्तर अहवाल विभागाला पाठवला होता.

कोल्हापूर : कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिराच्या जतन संवर्धनासाठी व मूळ सौंदर्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला अपेक्षित असलेल्या परवानग्यांची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करू, मंदिरावरील रंग, चुना काढण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा पुरवू, अशी ग्वाही भारतीय पुरातत्व विभागाच्या संचालिका नंदिनी साहू यांनी मंगळवारी दिली.

मंदिराच्या मूळ रूपाचे जतन संवर्धन व अन्य डागडुजीसंदर्भात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने काही दिवसांपूर्वी सविस्तर अहवाल विभागाला पाठवला होता. त्या अनुषंगाने त्यांनी मंदिराची पाहणी केली. आज बुधवारी त्या खिद्रापूरची पाहणी करणार आहेत.अंबाबाई मंदिराच्या वास्तू सौंदर्याचे जतन करण्याचे काम देवस्थान समितीकडून सुरू असून, मूळ दगडी भिंतीवरील फरशी काढल्यानंतर आता त्यावरील रंग, चुना काढायचा आहे. गरूड मंडपाचा छत खाली आला आहे, नगारखान्याच्या वरच्या मजल्याची दुरवस्था झाली आहे.

मूळ मंदिराच्या छताला गळती आहे. काही ठिकाणी दगडांची अडत सुटली आहे. सिमेंट काँक्रीटचा थर आहे. मंदिराच्या बाह्य बांधकामावरील मूर्तींची अवस्था नाजूक झाली आहे. ६४ योगिनींच्या मूर्तिंचेही जतन करावे लागणार आहे. मणिकर्णिका कुंडाचे काम थांबले आहे. या सगळ्या कामांबाबतचा सविस्तर अहवाल पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने पुरातत्व खात्याला पाठवला होता. त्यानंतर साहू यांनी अंबाबाई मंदिराची पाहणी केली.यावेळी समितीच्या वतीने शिवराज नाईकवाडे यांनी पुरातत्वची एक व्यक्ती देवस्थान समितीला मिळावी तसेच समितीच्या वतीने पाठवण्यात येत असलेल्या प्रस्तावांना लवकरात लवकर मंजुरी मिळावी, अशी विनंती केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर