गांधीनगरच्या नवीन भूमिअभिलेख कार्यालयाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:31 IST2020-12-30T04:31:18+5:302020-12-30T04:31:18+5:30
गांधीनगरमधील भूमिअभिलेख कार्यालयाची दुरवस्था झाली असून, अंतर्गत फर्निचर, दरवाजे यांची मोडतोड झाली आहे. येथील कोट्यवधींचा दस्तऐवज रामभरोसे आहे. येथे ...

गांधीनगरच्या नवीन भूमिअभिलेख कार्यालयाची पाहणी
गांधीनगरमधील भूमिअभिलेख कार्यालयाची दुरवस्था झाली असून, अंतर्गत फर्निचर, दरवाजे यांची मोडतोड झाली आहे. येथील कोट्यवधींचा दस्तऐवज रामभरोसे आहे. येथे घाणीचे साम्राज्य पसरले असून, नागरिकांना कोणतीही सोयी-सुविधा मिळत नाही. कामकाजासाठी इमारतीबाहेरच तासन्तास थांबून राहावे लागते. त्यामुळे येथे सुसज्ज कार्यालय व्हावे किंवा सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे, अशी मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर भूमिअभिलेख अधीक्षक डॉ. वसंत निकम यांनी उपअधीक्षक सुधाकर पाटील यांना नवीन कार्यालयाची तत्काळ पाहणी करून त्याचा प्रस्ताव ५ जानेवारीपर्यंत अधीक्षक कार्यालयात पाठविण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार उपअधीक्षक पाटील गांधीनगर ग्रामपंचायतीने सुचविलेल्या कार्यालयाची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यानुसार येत्या काही दिवसांतच भूमिअभिलेख कार्यालय सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
२९ गांधीनगर व्हिजिट
फोटो ओळ - गांधीनगरच्या स्थलांतरित करण्यात येणाऱ्या नवीन भूमिअभिलेख कार्यालयाची पाहणी उपअधीक्षक सुधाकर पाटील यांनी केली. यावेळी सरपंच रितू लालवानी, भूमापक परीक्षक वैशाली निकम, सामाजिक कार्यकर्ते अमोल एकळ, आदी उपस्थित होते.