इचलकरंजीत पाणी पुनर्वापर केंद्राची आवाडेंकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:21 IST2021-01-17T04:21:31+5:302021-01-17T04:21:31+5:30
नदीतून उपसा केलेल्या पाण्यावर जलशुद्धीकरण केंद्रात शुद्धीकरणाची प्रक्रिया केली जाते. शुद्धीकरणानंतर जवळपास लाखो लिटर पाणी वॉशआऊटनंतर गटारीला सोडले जाते. ...

इचलकरंजीत पाणी पुनर्वापर केंद्राची आवाडेंकडून पाहणी
नदीतून उपसा केलेल्या पाण्यावर जलशुद्धीकरण केंद्रात शुद्धीकरणाची प्रक्रिया केली जाते. शुद्धीकरणानंतर जवळपास लाखो लिटर पाणी वॉशआऊटनंतर गटारीला सोडले जाते. त्यामुळे ते पाणी वाया जात होते. तसेच जलशुद्धीकरण केंद्राच्या पिछाडीस असलेल्या नागरी वस्तीतील रस्ते सतत पाण्याखालीच राहत होते. यासंदर्भात भागातील नागरिकांतून सतत तक्रारी होत होत्या. या पार्श्वभूमीवर या पाण्याचा पुनर्वापर करण्याच्या उद्देशाने ही योजना राबविण्यात आली. त्यानुसार 10 लाख लिटर क्षमतेची टाकी आणि संप व पंपगृह बांधले आहे. वॉशआऊटनंतर बाहेर जाणारे पाणी या टाकीत सोडण्यात येईल. त्यानंतर ते पाणी पुन्हा शुद्धीकरण प्रक्रिया करून पुनर्वापरात आणले जाणार आहे. या कामाची शनिवारी आ. आवाडे यांनी पाहणी करून माहिती घेतली. यावेळी पाणीपुरवठा सभापती दीपक सुर्वे, माजी सभापती विठ्ठल चोपडे, नगरसेवक सुनील पाटील, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता बाजी कांबळे, नितेश पोवार, सुभाष हावळ, अभिजित पटवा, उमेश पाटील आदी उपस्थित होते.