शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

maratha Kolhapur : सारथीच्या उपकेंद्रासाठी शहरातील चार जागांची पाहणी: शनिवारी होणार निश्चिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 13:26 IST

maratha Kolhapur : छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास (सारथी) संस्थेचे उपकेंद्र कोल्हापुरात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, सकल मराठा समाजातील समन्वय, आदींनी सोमवारी शहरातील चार जागांची पाहणी केली.

ठळक मुद्देसारथीच्या उपकेंद्रासाठी शहरातील चार जागांची पाहणी: शनिवारी होणार निश्चिती शिवाजी विद्यापीठ, राजाराम महाविद्यालय परिसरातील जागांचा समावेश

कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास (सारथी) संस्थेचे उपकेंद्र कोल्हापुरात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, सकल मराठा समाजातील समन्वय, आदींनी सोमवारी शहरातील चार जागांची पाहणी केली.

शिवाजी विद्यापीठ (राजेंद्रनगरकडील परिसर), राजाराम महाविद्यालय (प्री-आयएएस ट्रेनिंगजवळील परिसर), विचारेमाळ येथील समाजकल्याण विभाग आणि सदरबाजार येथील राजर्षी शाहू कॉलेजजवळील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागांचा समावेश होता. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी शनिवारी पुन्हा पाहणी करून यापैकी एक जागा उपकेंद्रासाठी निश्चित केली जाणार आहे.पालकमंत्री पाटील यांनी आमदार जाधव, ह्यसारथीह्णचे संकल्पक आणि सकल मराठा समाजाचे समन्वयक वसंतराव मुळीक, ॲड. गुलाबराव घोरपडे, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, ह्यसारथीह्णचे व्यवस्थापकीय अधिकारी अशोक पाटील, करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर, सकल मराठा समाजातील अवधूत पाटील, प्रताप नाईक यांच्यासमवेत सोमवारी दुपारी दीड ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत या चारही जागांची पाहणी केली. तेथील प्राथमिक स्वरूपातील माहिती घेतली. त्यानंतर पालकमंत्री पाटील यांनी या जागांची तांत्रिक माहिती संकलित करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.

सारथीच्या उपकेंद्रासाठी शहरातील चार जागांची पाहणी केली आहे. या जागांची तांत्रिक माहिती संकलित करण्यास अधिकाऱ्यांना सांगितले आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी शाहू छत्रपती, खासदार संभाजीराजे, ग्रामविकासमंत्री यांच्यासमवेत पुन्हा या जागांची पाहणी करण्यात येईल. त्यावेळी यापैकी एक जागा उपकेंद्रासाठी निश्चित केली जाईल.-सतेज पाटील, पालकमंत्री.

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृहात कोविड सेंटरसदरबाजार येथील राजर्षी शाहू कॉलेजजवळील परिसरात गेल्या दोन वर्षांपूर्वी मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह सुरू करण्यात आले. कोरोनामुळे गेल्यावर्षी मार्चपासून येथील विद्यार्थी आपापल्या घरी गेले आहेत. या वसतिगृहात गेल्यावर्षी आणि यंदा कोविड केअर सेंटर करण्यात आले आहे. 

टॅग्स :marathaमराठाShivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर