उदगाव येथे कोरोना केअर सेंटरची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:24 IST2021-04-08T04:24:31+5:302021-04-08T04:24:31+5:30
उदगाव : शिरोळ तालुक्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या चिंतनीय आहे. उदगांव (ता. शिरोळ) येथील कुंजवन कोरोना केअर सेंटरने ...

उदगाव येथे कोरोना केअर सेंटरची पाहणी
उदगाव : शिरोळ तालुक्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या चिंतनीय आहे. उदगांव (ता. शिरोळ) येथील कुंजवन कोरोना केअर सेंटरने या आधी खूप चांगले काम केले आहे. या सेंटरमध्ये कोणत्याही कोरोनाग्रस्त रुग्णाची गैरसोय होता कामा नये. याठिकाणी स्वॅब तपासणी केंद्रही सुरू होत असल्याने शिरोळ तालुक्यातील रुग्णांना सोयीस्कर होणार असल्याचे उपजिल्हाधिकारी किशोर पवार यांनी सांगितले.
उदगांव (ता. शिरोळ) येथे कुंजवन सेंटरला उपजिल्हाधिकारी किशोर पवार यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे यांनी येथील कोविड केअर सेंटरची माहिती दिली. यावेळी उपजिल्हाधिकारी पवार यांनी येथील स्थानिक पदाधिकारी व अधिकारी यांना सूचना केल्या. यावेळी सरपंच कलुमीन नदाफ व तलाठी एस. व्ही. चांदणे यांनी कोरोना सेंटरचे चांगले नियोजन करणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी तहसीलदार मोरे यांनी कुंजवन सेंटरला जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही कमतरता भासू देणार नसल्याचे सांगितले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य रमेश मगदूम, दिलीप कांबळे, सलिम पेंढारी, अरूण कोळी, सुवर्णा सुतार, कृषी सहाय्यक एस. पी. माळी, पोलीस पाटील अनुराधा कांबळे यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो - ०७०४२०२१-जेएवाय-०५
फोटो ओळ - उदगांव (ता. शिरोळ) येथे कुंजवन कोविड सेंटरची पाहणी उपजिल्हाधिकारी किशोर पवार यांनी केली. यावेळी प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.