शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: उर्दू शाळा तपासा; बोगसगिरी आढळल्यास कारवाई करा; अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षांची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 12:40 IST

अनुदान लाटणाऱ्यांना चाप

कोल्हापूर : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अनुदान लाटण्यासाठी खोट्या उर्दू शाळा दाखवल्या आहेत. नागपूरसारख्या ठिकाणी रॅकेट उघडकीस आले असून ६०० बोगस शिक्षक सापडले आहेत. कुठे शाळा बोगस आहेत, कुठे शिक्षक तर कुठे त्यांची डिग्री, सहकुटुंब शिक्षक दाखवले आहेत, या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व उर्दू शाळांची तपासणी करा, दोषी आढळल्यास तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्याची माहिती अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी मंगळवारी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १५ कलमी कार्यक्रमाच्या आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे उपस्थित होते. प्यारे खान म्हणाले, अल्पसंख्याक म्हणजे फक्त मुस्लीम असा समज आहे, पण शीख, जैन, पारसी, ख्रिश्नचन, बौद्धदेखील अल्पसंख्याकांमध्ये येतात, याबद्दल जागृती झाली पाहिजे. उर्दू शाळा नावाला आहेत, तिथे मुलामुलींना योग्य व स्पर्धेत टिकून राहण्यासाठीचे दर्जेदार शिक्षण दिले जात नाही.

मराठी दोन नंबरची भाषा असावीउर्दू शाळांमधील शिक्षणाचा मुलांना उपयोग होत नाही. एक अक्षर न शिकलेल्या विद्यार्थ्यांचा, शाळांचा निकाल ९५ टक्के येतो. हेच पेपर तज्ज्ञ शिक्षकांकडे तपासायला दिले, तर निकाल ५० टक्के सुद्धा लागणार नाही. त्यामुळे सातवी आठवीनंतर मुले भाजी, फळ विकतात. यामुळे मुस्लीम तरुणाईची प्रशासन व नोकरीत संख्या कमी होत आहे. या शाळांमध्ये फक्त एक विषय उर्दू ठेऊन अन्य विषय मराठीत, सेमी इंग्रजीत शिकवले गेले पाहिजेत.

वादग्रस्त बोर्ड हटविण्याचे आदेशकोल्हापुरात विशिष्ट धर्मावर आर्थिक बहिष्कार टाकण्याचे डिजीटल लावले जात आहे, याबाबत खान म्हणाले, जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटवल्यापासून तेथील जनतेला रोजगार मिळाला आहे. पहलगाम घटनेनंतर इतिहासात पहिल्यांदा काश्मिरच नव्हे, तर मुस्लीम जनता पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत आहे. प्रत्येक मदरसा, मशिदींमध्ये बळी पडलेल्यांसाठी दुवा केली जात आहेत. मुस्लीम समाज मोदींच्या मागे गेला, तर अवघड होईल या भीतीने पाकिस्तानने हा भ्याड हल्ला केला आहे. त्याचा फायदा मुठभर नेते घेत आहेत, कोल्हापुरात, महाराष्ट्रात हे राजकारण चालणार नाही. तो वादग्रस्त बोर्ड हटवण्याची सूचना पोलिसांना केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuslimमुस्लीमSchoolशाळा