भादवण येथे ग्राहक व खरेदी यांच्याकडून युरिया खताची चौकशी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:23 IST2021-03-25T04:23:03+5:302021-03-25T04:23:03+5:30
भादवण येथे शेती सेवा केंद्राच्या नावाखाली खासगी दुकानदार खताचा वारेमाप साठा करून ठेवतात आणि ज्यावेळी शेतकऱ्यांना गरज असते. त्यापूर्वीच ...

भादवण येथे ग्राहक व खरेदी यांच्याकडून युरिया खताची चौकशी सुरू
भादवण येथे शेती सेवा केंद्राच्या नावाखाली खासगी दुकानदार खताचा वारेमाप साठा करून ठेवतात आणि ज्यावेळी शेतकऱ्यांना गरज असते. त्यापूर्वीच चढ्या भावाने विक्री करून कृत्रिम टंचाई निर्माण करतात अशी तक्रार आल्याने तालुका कृषी अधिकारी मोमीन यांनी १८ मार्च २०२१ रोजी गावास भेट देऊन टॉप २० खत खरेदीदार शेतकऱ्यांची यादी तपासली असता तक्रारीनुसार चौकशी सुरू आहे.
दुकानदार व खरेदीदार यांचे जबाब घेण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर दुकानदार व खरेदीदार दोषी आढल्यास याबाबत योग्य कारवाई संबंधितांवर करणार असल्याचे मोमीन यांनी सांगितले.
कोट...
चौकशी करून कारवाई करा
शेती केंद्राकडून तक्रारी आल्याने कृषी विभागाने भेट घेऊन जबाब नोंदविले आहेत. युरियामध्ये घोटाळा केल्याचा संशय बळावला आहे. त्यामुळे चौकशी करून कारवाई करा, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.
- संजय पाटील, सरपंच.