शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

चौकशी ‘ईडी’नेच करावी--राजू शेट्टी यांचा जबाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 00:53 IST

कोल्हापूर : महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने खासगी संस्थांना विक्री केलेल्या व्यवहाराची व्याप्ती मोठी असल्याने यामध्ये काही कारवाई व्हावयाची असेल,

ठळक मुद्दे साखर कारखाना विक्रीची सीआयडीकडून चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने खासगी संस्थांना विक्री केलेल्या व्यवहाराची व्याप्ती मोठी असल्याने यामध्ये काही कारवाई व्हावयाची असेल, तर या प्रकरणाची चौकशी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) नेच करावी, असा जबाब खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी दिला. शेट्टी यांनी केलेल्या तक्रारीनुसार या व्यवहारांची राज्य शासनाच्या राज्य गुन्हे अन्वेषण शाखेकडून (सीआयडी) चौकशी सुरू झाली असून, त्यासाठी हा जबाब घेण्यात आला.राज्यातील ३६ सहकारी साखर कारखान्यांची ९६० कोटी रुपयांना विक्री झाली असून, बाजारभावाप्रमाणे या विक्रीपोटी १० हजार कोटी रुपये यायला हवेत, असे शेट्टी यांचे म्हणणे आहे. या व्यवहारात मोठा गैरव्यवहार झाल्याची त्यांची तक्रार आहे. मागच्या पाच वर्षांत अडचणीत आलेले कारखाने विक्री करण्याचा जणू सपाटाच सुरू होता. ज्यांच्या गैरकारभार व भ्रष्टाचारामुळे हे कारखाने बंद पडले, त्यांनीच स्वत:च्या खासगी संस्थेकडून किंवा कुणाला तरी पुढे करून हे कारखाने विकत घेतले आहेत. त्याबद्दल खासदार शेट्टी यांनी ईडी तसेच उच्च न्यायालयात याचिका व मुख्यमंत्र्यांकडेही वारंवार तक्रारी केल्या होत्या. मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आलेल्या तक्रारींची दखल घेऊन त्यांनी ही चौकशी राज्य गुन्हे शाखेकडे सोपविली होती. या शाखेचे उपमहानिरीक्षक जय जाधव यांनी शेट्टी यांचा कोल्हापुरात येऊन जबाब नोंदविला.शेट्टी यांनी सांगितले, ‘हा सगळा व्यवहारच संशयास्पद आहे. ज्या बँकांनी कर्ज दिले व ते थकीत राहिले म्हणून कारखाने विक्रीस काढले. ज्यांनी हे कारखाने विकत घेतले त्या संस्थेच्या संचालकांचीही चौकशी होणे आवश्यक आहे. जिल्हा बँका व सहकारी बँकेच्या तत्कालीन पदाधिकारी व अधिकाºयांनी या व्यवहारात मोठा डल्ला मारला आहे. त्याबद्दल त्या-त्या कारखान्यांच्या सभासदांनी पुराव्यांनिशी तक्रारी केल्या आहेत. त्यांच्याशी संपर्क साधून त्याचे पुरावे गोळा करण्याची गरज आहे. त्यांच्याही साक्षी घेतल्या जाव्यात. या कारखान्यांची विक्री करताना मात्र कोणतेही आर्थिक निकष न पाळता खिसे भरण्याचे व्यवहार झाले आहेत.’ऊस दराचा फैसला ‘स्वाभिमानी’च करेलगाळप हंगामापूर्वी उसाचा दर जयसिंगपूर येथे ऊस परिषदेत ठरविण्याची गेल्या १५ वर्षांची परंपरा आहे. त्यामुळे कोणी काही म्हटले तरी ऊस दराचा फैसला ‘स्वाभिमानी’च करील, असा टोला खासदार राजू शेट्टी यांनी कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना हाणला. आगामी गळीत हंगाम, ऊस परिषद आणि राज्यमंत्री खोत यांनी जाहीर केलेली एफआरपी + ३०० या पार्श्वभूमीवर शेट्टी बोलत होते. जयसिंगपुरात २८ ला ऊस परिषद होत आहे.