शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

एचडीएफसी बँक आॅनलाईन दरोड्याची वरिष्ठ पातळीवर चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 16:37 IST

एचडीएफसी बँकेच्या येथील शाहूपुरी शाखेतून ६७ लाख ८८ हजार रुपयांच्या आॅनलाईनद्वारे दरोड्याची वरिष्ठ स्तरावर चौकशी सुरू आहे. परिक्षेत्रातील आठ पथकांद्वारे या गुन्ह्याचा तपास चालू आहे.

ठळक मुद्देएचडीएफसी बँक आॅनलाईन दरोड्याची वरिष्ठ पातळीवर चौकशीपरिक्षेत्रातील आठ विशेष पथकांद्वारे शोधमोहीम सुरू : चौघे ताब्यात

कोल्हापूर : एचडीएफसी बँकेच्या येथील शाहूपुरी शाखेतून ६७ लाख ८८ हजार रुपयांच्या आॅनलाईनद्वारे दरोड्याची वरिष्ठ स्तरावर चौकशी सुरू आहे. परिक्षेत्रातील आठ पथकांद्वारे या गुन्ह्याचा तपास चालू आहे.

रविवारी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांनी सायबर पथकातील कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन तपासासंबंधी मार्गदर्शन केले. आतापर्यंत या गुन्ह्यात झारखंड येथून तीन आणि कोलकाता येथून एक असे चार संशयित ताब्यात घेतले आहेत. दरम्यान, झारखंड येथील आधार हौसिंग फायनान्स कंपनीच्या तिघा कर्मचाऱ्यांना शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून महत्त्वाची माहिती मिळाली असून, या आॅनलाईन दरोड्यामध्ये मोठे रॅकेट असल्याचे निदर्शनास आले आहे. कोलकाता येथून एकाला ताब्यात घेतले आहे.

ओरिसा येथून या चौघा संशयितांना घेऊन पथक सोमवारी पहाटेपर्यंत कोल्हापुरात येत आहे. तपासाची व्याप्ती मोठी असल्याने विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण आणि सोलापूर ग्रामीण या पाच जिल्ह्यांतील आठ पथकांद्वारे तपास करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार शाहूपुरी पोलीस ठाण्यात रविवारी पथकांची बैठक घेऊन निरीक्षक मोरे यांनी तपासासंबंधी मार्गदर्शन केले.

सातारा येथे सायबर विभागाचे केंद्र आहे. येथील काही कर्मचारी आॅनलाईन दरोड्याची माहिती घेण्यासाठी कोल्हापुरात आले होते. त्यांनीही पोलीस निरीक्षक मोरे यांची भेट घेऊन माहिती घेतली. आॅनलाईन दरोड्यातील मास्टरमाइंड हॅकर्सचा मुंबई, पुणे आणि कोल्हापूर सायबर विभागाचे पथक शोध घेत आहे. अद्यापही त्याचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.हरियाणा येथील एचडीएफसी बँकेवर दरोडाबँकेचे सर्व्हर हॅक करून हॅकर्सनी अतिजलद संगणक कार्यप्रणालीचा आॅनलाईन वापर करून नागपूर येथील शिक्षक सहकारी बँकेचे व्यवहार असलेल्या एचडीएफसी बँकेवर १९ फेब्रुवारीला हॅकर्सनी दरोडा टाकला होता. त्यानंतर १९ एप्रिलला शाहूपुरी येथील एचडीएफसी शाखेवर दरोडा पडला.

शासकीय सुटीदिवशीच हॅकर्स आॅनलाईन दरोडा टाकत असल्याची पोलिसांना शंका आहे. रविवार सुटीदिवशी हरियाणा येथील एचडीएफसी बँकेवर आॅनलाईन दरोडा पडला आहे. त्यानुसार ५ जूनला शासकीय सुटी आहे. त्यावेळी हॅकर्स आॅनलाईन दरोडा टाकण्याची दाट शक्यता आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर