शहरं
Join us  
Trending Stories
1
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
2
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
3
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
4
"तो आनंदी होता, आम्ही ४० मिनिटं व्हिडीओ कॉलवर बोलला..."; लेकाच्या मृत्यूने वडिलांना धक्का
5
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video
6
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
7
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
8
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
9
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
10
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
11
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
12
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
13
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
14
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
15
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
16
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
17
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
18
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
19
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
20
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात

येणेचवंडी पाणी योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 11:29 IST

येणेचवंडी (ता. गडहिंग्लज) येथील राष्ट्रीय पेयजल योजनेच्या कामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार ग्रामस्थ अंकुश कुराडे यांनी पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेऊन पुणे विभागाचे नियोजन शाखेचे उपायुक्तउत्तम चव्हाण यांच्याकडे तक्रार वर्ग करण्यात आली आहे. परिणामी योजनेत ढपला मारलेल्या पुढाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देयेणेचवंडी पाणी योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी सुरूढपला मारलेल्यांची धावपळ : योजना होऊनही पाण्याचा ठणठणाट

कोल्हापूर : येणेचवंडी (ता. गडहिंग्लज) येथील राष्ट्रीय पेयजल योजनेच्या कामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार ग्रामस्थ अंकुश कुराडे यांनी पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेऊन पुणे विभागाचे नियोजन शाखेचे उपायुक्तउत्तम चव्हाण यांच्याकडे तक्रार वर्ग करण्यात आली आहे. परिणामी योजनेत ढपला मारलेल्या पुढाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.पाणीटंचाई कायस्वरूपी निकालात निघण्यासाठी एक कोटी रुपये खर्चून पेयजल योजनेतून दोन योजना राबविल्या. गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या धरणातून पाणी उपसण्यासाठी जॅकवेल बांधण्यात आले; मात्र जॅकवेलपर्यंत ऐन उन्हाळ्यात पाणी पोहोचत नाही. पाणी शुद्धीकरणाची यंत्रणा निकृष्ट दर्जाची आहे. यामुळे पाणी पिण्यास योग्य नाही. जॅकवेलजवळील पाणी कमी झाल्यानंतर दोन महिने पाणीटंचाई निर्माण होते. अशा अनेक प्रकारच्या त्रुटी योजनेत आहेत.

वारंवार अंतर्गत पाईपलाईन फुटते. यामुळे ग्रामस्थांची ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशी अवस्था झाली आहे. योजनेत काही गाव पुढाऱ्यांनी मोठा ढपला मारला आहे, कामात भ्रष्टाचार झाला आहे, त्याची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी कुराडे मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करीत आहेत.

यासंबंधीचे वृत्त ‘लोकमत’मध्ये ठळकपणे रविवारी प्रसिद्ध झाल्यानंतर योजनेतील गैरकामकाजाचे बिंग फुटले. प्रशासकीय पातळीवरही धावाधाव सुरू झाली आहे. गावाबाहेर राहून सूत्रे हलविणारे पुढारी ढपला चव्हाट्यावर येऊ नये; यासाठी दबावतंत्राचा अवलंब करत आहेत; मात्र कुराडे यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता, ठोस पाठपुराव्याचा रेटा लावल्याने त्यांची अडचण झाल्याचे चित्र आहे.कामात पैसे मुरवल्याची चर्चायोजनेत डल्ला मारून काही कारभारी मालामाल झाल्याची चर्चा गावात अनेक दिवसांपासून आहे; पण एकमेकांचे नातेवाईक, पै-पाहुणे, संधी साधू राजकीय हितसंबंधामुळे तक्रार करण्यास कोणी पुढाकार घेतले नव्हते. स्वच्छ पाणी न मिळाल्याने ग्रामस्थांची होणारी गैरसोय, हाल पाहून कुराडे यांनी तक्रार करण्याचे धाडस केले.

इस्टिमेट वाढविण्यासाठी पुढाऱ्यांनी जॅकवेलची जागा चुकीची निवडली. पाईपही निकृष्ट दर्जाचे वापरले आहेत. ते वारंवार फुटतात. पाईपलाईन टाकतानाही पुढाºयांनी आपल्या शेताजवळून कशी जाईल, यावर विशेष लक्ष दिले. यामुळे पाणी योजनेची वाट लागली. यातील दोषींना कारवाई होईपर्यंत पाठपुरावा करत राहणार आहे.अंकुश कुराडे, तक्रारदार 

 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईkolhapurकोल्हापूर