शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

Hatkanangle LokSabha Constituency: माझी ईडीमार्फत चौकशी करा; 'ती' पोस्ट व्हायरल होताच राजू शेट्टींनी दिले आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 13:17 IST

इचलकरंजीचे पाणी राजकारणात अडकले

इचलकरंजी : केंद्र आणि राज्यात एकच सरकार आहे. त्यांनी ईडीमार्फत माझी चौकशी करावी आणि माझ्याकडे असलेल्या जमिनीचा शोध घ्यावा, असे आव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारला दिले. शेट्टींनी शहरातील काही कुटुंबांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.शेट्टी म्हणाले, माझ्याकडे २०० एकर जमीन असल्याची पोस्ट ज्यांनी व्हायरल केली, त्यांची राज्यात आणि केंद्रात सत्ता आहे. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स तसेच आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग यांसारख्या संस्था त्यांच्याकडे आहेत. त्यांच्याकडून माझी चौकशी करावी. जनतेला आणि मला पण कळेल की, माझ्याकडे किती जमीन आहे.इचलकरंजी पाणी योजनेसंदर्भात बोलताना ते म्हणाले, ‘अंधा कानून’ चित्रपटाप्रमाणे न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मी भोगत आहे. मला पाच वर्षांचा वनवास सहन करावा लागला, हे इचलकरंजीकरांच्या लक्षात आले आहे. त्याबद्दल माझी कोणाकडे तक्रारही नाही. मात्र, मी कामाचा माणूस आहे. शहरातील पाण्याचा प्रश्न मी सोडवू शकतो. मी ज्या चळवळी केल्या, त्याचा सक्सेस रेटही चांगला आहे. दानोळी (ता. शिरोळ) येथील आंदोलनादरम्यान व्यासपीठावर जाऊन पाण्याला विरोध करू नका म्हणून सांगणारा मी नेता आहे. शेतकऱ्यांना पाणी कमी पडणार नाही, याचीही ग्वाही मी दिली होती. मात्र, कटकारस्थान करून काही मंडळींनी मुद्दामहून मला यात अडकवले. ज्यांनी कट केला, आज तुमचा यामध्ये संबंध नाही, असे मला सांगत आहेत. इचलकरंजीचे पाणी राजकारणात अडकले आहे. रस्त्यावरची लढाई करून हे पाणी आणावे लागेल आणि ती लढाई करण्याची धमक आणि ताकद माझ्यात आहे. शहराला टफ् योजनेच्या माध्यमातून ४६० कोटी रुपये आणून दिले. यापूर्वी आणि आताच्या खासदारांना ते जमले नाही. भविष्यात वीजसवलत, व्याज अनुदान हे प्रश्न सोडविणार आहे. यंत्रमागधारकांना नाबार्डसारख्या योजनेतून कमी व्याज दराने कर्जपुरवठा करण्यासाठी सरकारमार्फत यंत्रणा उभी करण्यासाठी पाठपुरावा करीन.‘मशाल’ का घेतली नाही?‘मशाल घेणे’ याचा अर्थ एबी फॉर्म घेणे आणि ते घेण्यासाठी शिवसेनेत प्रवेश करावा लागला असता. शेतकऱ्यांनी ३० वर्षे मला तळहाताच्या फोडासारखे जपले आहे. माझ्या स्वार्थासाठी त्यांना आणि चळवळीला वाऱ्यावर सोडणे शक्य नव्हते. त्यामुळे मी मशाल हाती घेतली नाही, असे शेट्टी यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय