नोकरभरतीची चौकशी करा

By Admin | Updated: April 10, 2016 00:59 IST2016-04-10T00:59:47+5:302016-04-10T00:59:47+5:30

ँप्राथमिक शिक्षक बँक : शिक्षक संघाची उपनिबंधकांकडे मागणी

Inquire about recruitment | नोकरभरतीची चौकशी करा

नोकरभरतीची चौकशी करा

कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक बँकेमध्ये बेकायदेशीर नोकरभरती केली असून, त्याच्यासह संपूर्ण कामकाजाची चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रविकुमार पाटील यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे.
प्राथमिक शिक्षक बँकेत संचालकांनी नातेवाइकांची भरती केली आहे. ही भरती बेकायदेशीर असून निबंधक कार्यालय व युनियनची परवानगी न घेता ही भरती केली आहे. रिझर्व्ह बॅँकेच्या धोरणानुसार सध्या बँकेत नोकरभरतीची गरज नव्हती. बॅँकेने यापूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून कोअर बॅँकिंग केले. पुरेसे नोकर असताना जाणीवपूर्वक शिपायांना सक्तीच्या रजेवर पाठवून ही नोकरभरती केली आहे. ज्येष्ठता डावलून मनमानी पदोन्नती देऊन शिपाई व लिपिक भरती केलेली आहे. बॅँकेच्या सभासदांना गेले अनेक वर्षे लाभांश नसताना संचालकांच्या भल्यासाठी भरतीची गरज काय? असा सवाल जिल्हाध्यक्ष रविकुमार पाटील यांनी केला.
बेकायदेशीर व पोटनियमातील तरतूद डावलून तज्ज्ञ संचालकांची नेमणूक केलेली आहे. सर्वसाधारण सभेला सभासद वर्गणी एक हजार करण्याचा विषय होता, पण विषय चर्चेला येण्यापूर्वीच गोंधळात नामंजूर झाला. तरीही सातशे रुपये जबरदस्तीने सभासदांकडून वर्गणी वसुली सुरू आहे. काही सभासदांना राजकीय द्वेषातून कर्ज प्रकरणे नामंजूर केले जाते. एकीकडे १ टक्का व्याज वाढवून दुसरीकडे सभासदांचे व्याज गिळंकृत करून बॅँक निवडणुकीत खोटा ताळेबंद सादर केला. खोटा ताळेबंद सादर करणाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी पाटील यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे.

Web Title: Inquire about recruitment