राधानगरी आगारप्रमुखांच्या कारभाराची चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:22 IST2021-03-18T04:22:35+5:302021-03-18T04:22:35+5:30
निवेदनात म्हटले आहे की, राधानगरी तालुक्यातील एस.टी. आगारामध्ये सागर पाटील हे प्रभारी आगारप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. सागर पाटील यांनी ...

राधानगरी आगारप्रमुखांच्या कारभाराची चौकशी करा
निवेदनात म्हटले आहे की, राधानगरी तालुक्यातील एस.टी. आगारामध्ये सागर पाटील हे प्रभारी आगारप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. सागर पाटील यांनी प्रभारी पदभार स्वीकारल्यापासून एस.टी. गाड्यांचे नियोजन ढिसाळ झाले आहे. कार्यालयातही ते वारंवार गैरहजर असतात. आगाराभोवती बांधलेली संरक्षण भिंत पडलेली असून, ती परत बांधण्यासाठी पाठपुरावा करूनही पूर्तता होत नाही. याबाबत पाटील यांच्याकडे विचारणा केली असता ते समाधानकारक उत्तर देत नाहीत. आगारामध्ये एस.टी.ची कमतरता, एसटीच्या फेऱ्यांचे नियोजनाअभावी प्रवाशांचे हाल होत असून, एस.टी.ला आर्थिक फटकाही बसत आहे. त्यामुळे त्यांच्या कामाची चौकशी करून त्यांची बदली करावी, अशी मागणी कांबळे यांनी केली आहे. निवेदनाच्या प्रति परिवहनमंत्री अनिल परब, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांना दिल्या आहेत.