रंगकर्मींचा कसबा बावड्यात अभिनव कलाबाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:23 IST2021-09-13T04:23:11+5:302021-09-13T04:23:11+5:30
कोल्हापूर : येथील रंगकर्मींनी रविवारी मध्यवर्ती बसस्थानक परिसर तसेच भगवा चौक, कसबा बावडा येथे सांस्कृतिक कलाबाजार मांडला होता. सांस्कृतिक ...

रंगकर्मींचा कसबा बावड्यात अभिनव कलाबाजार
कोल्हापूर : येथील रंगकर्मींनी रविवारी मध्यवर्ती बसस्थानक परिसर तसेच भगवा चौक, कसबा बावडा येथे सांस्कृतिक कलाबाजार मांडला होता. सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी द्यावी या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापुरातील रंगकर्मींमार्फत अभिनव आंदोलन करण्यात येत आहे.
रविवारी बसस्थानक परिसर तसेच भगवा चौक येथील या आंदोलनाचे आयोजन सुनील घोरपडे, धनंजय पाटील, प्रसाद जमदग्नी, मुकुंद सुतार, रोहन घोरपडे, समीर भोरे, समीर पंडितराव यांनी केले.
यामध्ये दिनेश माळी, सूरज नाईक, रविकुमार सुतार, इंद्रजित जोशी, झंकार सुतार आणि अंध गायक सिद्धराज पाटील यांनी गाणी गायिली. श्रद्धा शुक्ल आणि अविनाश गायकवाड, संस्कृती शुक्ल यांनी नृत्ये सादर केली. महेश सोनुले, मकरंद लिंगनूरकर, स्वप्निल माळी मंजिरी देवन्नावर व इतर कलाकार हजर होते. इम्पा इव्हेंट्सचे सर्व सदस्य, विवेक मंद्रुपकर, रहीम सनदी, नमो नमो संघटनेचे महेश बंगडे यांनी कलाकारांना पाठिंबा दिला. रमेश सुतार यांनी ध्वनी व्यवस्था पाहिली.
आज, सोमवारी सकाळी ठीक अकरा वाजता ताराराणी चौक, कावळा नाका तसेच दुपारी साडेबारा वाजता राजारामपुरी येथे कला बाजार भरणार आहे.