अभियांत्रिकीतून नवनिर्मिती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:29 IST2021-09-17T04:29:12+5:302021-09-17T04:29:12+5:30

गडहिंग्लज : थोर स्थापत्य अभियंते व नवभारताचे निर्माते भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन अभियंते व ...

Innovate through engineering | अभियांत्रिकीतून नवनिर्मिती करा

अभियांत्रिकीतून नवनिर्मिती करा

गडहिंग्लज :

थोर स्थापत्य अभियंते व नवभारताचे निर्माते भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन अभियंते व आर्किटेक्ट यांनी स्थापत्य अभियांत्रिकीच्या माध्यमातून नवनिर्मिती करावी, असे प्रतिपादन सहा. अभियंता आदित्य भोसले यांनी केले.

गडहिंग्लज आर्किटेक्चर ॲण्ड इंजिनिअर्स असोसिएशनतर्फे एम. विश्वेश्वरय्या यांना जन्मदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ जे. बी. बारदेस्कर होते. बारदेस्कर यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले.

यावेळी पं. स. सदस्य व इंजि. विद्याधर गुरबे, इंजि. अण्णासाहेब गळतगे, इंजि. सयाजीराव भोसले, असोसिएशनचे उपाध्यक्ष कृष्णात घोरपडे, रमेश गायकवाड, सचिव अजित कित्तूरकर, खजिनदार संदीप पाटील, बाळासाहेब गुरव, किशोर हंजी, चंद्रकांत सावंत, उदयसिंह जाधव, शैलेंद्र कावणेकर, विरूपाक्ष पाटणे, दयानंद गुरव, दत्ताराम पाटील, श्रीरंग राजाराम, राजेंद्रकुमार पाटील, राजेंद्र देशमाने आदी उपस्थित होते.

असोसिएशनचे अध्यक्ष इंजि. संजय नाईक यांनी स्वागत केले. अजित उत्तूरकर यांनी सूत्रसंचलन करून आभार मानले.

फोटो ओळी : गडहिंग्लज येथील कार्यक्रमात एम. विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन जे. बी. बारदेस्कर यांच्या हस्ते झाले. यावेळी आदित्य भोसले, विद्याधर गुरबे, अण्णासाहेब गळतगे, संजय नाईक, चंद्रकांत सावंत आदी उपस्थित होते.

क्रमांक : १६०९२०२१-गड-०४

Web Title: Innovate through engineering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.