शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: 'अथर्व दौलत'च्या जखमी कामगाराचा मृत्यू, ड्रेन व्हॉल्व उघडताना तोल जाऊन पडले होते उंचावरून 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 16:05 IST

नुकसान भरपाईसाठी ढेकोळवाडी ग्रामस्थ आक्रमक

चंदगड : ड्रेन व्हाॅल्व उघडताना तोल जाऊन उंचावरून पडल्याने पंधरा दिवसांपूर्वी हलकर्णी येथील अथर्व-दौलत कारखान्यात गंभीर जखमी झालेल्या कामगाराचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. कारखान्याकडून मृताच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी ढेकोळवाडी ग्रामस्थांनी कारखाना प्रशासनासमोर मागणी उचलून धरत कारखाना कार्यस्थळावर रुग्णवाहिकेतून मृतदेह ठेवल्यामुळे रविवारी रात्री उशिरापर्यंत वातावरण तणावपूर्ण बनले होते.गुंडू रामू पाटील (वय ५१, रा. ढेकोळवाडी) असे मृत कामगाराचे नाव आहे. गुंडू हा १७ फेब्रुवारी रोजी कामावर असताना ड्रेन व्हाॅल्व उघडताना १२ फूट उंचावरून खाली पडला. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी गडहिंग्लज येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी उपचार सुरू असताना गुंडू याचे निधन झाले. घटनेची नोंद चंदगड पोलिसात करण्यात आली आहे.

दरम्यान कामगाराच्या पश्चात त्याचे कुटुंब उघड्यावर पडले असून मृत गुंडूच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय कारखाना कार्यस्थळावरुन मृतदेह हलवणार नाही, असा पवित्रा घेतला. गेल्या काही दिवसांपूर्वीही एका कारखान्यातील कामगाराला त्या प्रशासनाने मोठी भरपाई दिली, असे सांगत पोलिस असतानाही वातावरण तणावपूर्ण बनले होते. रात्री उशिरापर्यंत यावर निर्णय झाला नाही. त्यामुळे कारखानाही बंद करण्यात आला होता. ग्रामस्थांसह नातेवाईक आक्रमक झाल्याने पोलिस उपअधीक्षक रामदास इंगवले, पोलिस निरीक्षक नितीन सावंत, सहायक पोलिस निरीक्षक लाला गाढवे व पोलिस कर्मचारी घटनास्थळी ठाण मांडून होते.

नियमानुसार भरपाई देण्यास तयारकामगाराचा मृत्यू ही दुर्दैवी घटना असून नियमानुसार होणारी भरपाई देण्यासाठी कारखाना प्रशासन तयार आहे, अशी माहिती सचिव विजय मराठे यांनी सांगितली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेchandgad-acचंदगड