शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: गुंडांच्या मारहाणीतील जखमी स्विटमार्ट चालकाचा मृत्यू, दोघांवर खुनाचा गुन्हा

By उद्धव गोडसे | Updated: January 1, 2024 15:44 IST

पोलिसांच्या दुर्लक्षामुळे गुंडांचे फावल्याचा नातेवाईकांचा आरोप

कोल्हापूर : उद्यमनगर येथील स्विटमार्टमधील पदार्थ फुकट का खायला देत नाहीस, अशी विचारणा करीत दोन गुंडांनी घरात घुसून स्विटमार्टचे मालक शिवकुमार लक्ष्मीनारायण बघेल (वय ३३, रा. यादवनगर, कोल्हापूर) यांना बेदम मारहाण केली होती. २८ डिसेंबर रोज दुपारी तीनच्या सुमारास झालेल्या मारहाणीतील जखमी बघेल यांचा उपचारादरम्यान सोमवारी (दि. १) सकाळी सीपीआरमध्ये मृत्यू झाला. गुंडांच्या मारहाणीत बघेल यांचा मृत्यू झाल्यामुळे संतप्त नातेवाईकांनी राजारामपुरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित केली. मारहाण करणारे दोघे सध्या पोलिस कोठडीत आहेत.उद्यमनगर परिसरात फाळकूट दादांची दहशत वाढली आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्यानंतरही पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याने काही गुंड व्यावसायिकांकडून हप्तेवसुली करीत आहेत, असा परिसरातील नागरिकांचा आरोप आहे. गुंड प्रथमेश सतीश शिंगे (वय २३, रा. यादवनगर, कोल्हापूर) आणि दिलीप हिंदुराव पाटील (वय ३३, रा. रायगड कॉलनी, पाचगाव) या दोघांनी २८ डिसेंबर रोजी उद्यमनगरातील श्रीराम स्विट मार्टचे मालक शिवकुमार बघेल यांना घरात घुसून बेदम मारहाण केली होती.तसेच गुंडांनी दहशत माजवण्यासाठी परिसरातील नागरिकांच्या वाहनांचीही तोडफोड केली होती. फुकट मिठाई देत नसल्याच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत बघेल बेदम जखमी झाले होते. उपचारादरम्यान सोमवारी सकाळी सीपीआरमध्ये त्यांचा मृत्यू झाला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

निर्मला शिवकुमार बघेल (वय ३३, रा. उद्यमनगर) यांच्या फिर्यादीनुसार राजारामपुरी पोलिसांनी खुनी हल्ल्याचा गुन्हा दाखल केला होता. हल्लेखोर शिंगे आणि पाटील या दोघांना अटक केली असून, त्यांची पोलिस कोठडीत रवानगी झाली आहे. त्यांच्यावर आता खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस