युवकांच्या कौशल्य विकासासाठी पुढाकार घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:18 IST2021-07-18T04:18:48+5:302021-07-18T04:18:48+5:30
कोल्हापूर : कोरोनाच्या महामारीनंतर बेरोजगार युवा पिढीला आता कौशल्य दाखविले तरच नोकरी मिळणार आहे. त्यामुळे त्यांच्या कौशल्य विकासासाठी स्थिरावलेल्या ...

युवकांच्या कौशल्य विकासासाठी पुढाकार घ्यावा
कोल्हापूर : कोरोनाच्या महामारीनंतर बेरोजगार युवा पिढीला आता कौशल्य दाखविले तरच नोकरी मिळणार आहे. त्यामुळे त्यांच्या कौशल्य विकासासाठी स्थिरावलेल्या युवकांनी पुढाकार घेऊन मदतीचा हात दिला पाहीजे, असे मत जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी व्यक्त केले.
‘कर्तृत्व’ या संस्थेमार्फत अन्नदान चळवळीत सहाय केलेल्या तरुण मंडळे, संस्थांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे मुख्य विराज सरनाईक होते.
जाधव म्हणाले, कोरोना काळात भुकेल्यांपर्यंत अन्न पोहोचविणे ही काळाची गरज होती. या कामाचे कौतुक करावे तितके थोडके आहे. पण आता युवा पिढीच्या हाताला काम देणे मोठे आव्हानात्मक काम आहे. त्यामुळे संस्थेने कौशल्य विकाससाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. या वेळी अन्नदान चळवळीत सहाय साकोली सेना ग्रुप, राजे ग्रुप कसबा बावडा, खंडेलवाल ग्रुप, टिंबर मार्केटमधील अंबिका यात्री निवास ग्रुप, महाद्वार रोडवरील गण गण गणात बोते मंडळ, जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील नितीन पवार, सुनील आमते, प्रदीप पाटील व प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. या वेळी सहायक पोलीस निरीक्षक आरती नांद्रेकर, कौस्तुुभ कुलकर्णी, विनीत जिरगे, दिग्विजय निंबाळकर, प्रतीक हेगिष्टे, शर्वली सरनाईक, स्नेहा सरनाईक, धैर्यशील भोईटे आदी उपस्थित होते.
फोटो : १७०७२०२१-कोल-कर्तृत्व
आेळी : कोल्हापुरातील कर्तृत्व या संस्थेमार्फत कोरोनाकाळात राबविण्यात आलेल्या अन्नदान चळवळीत सहाय केलेल्यांचा पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी सहायक पोलीस निरीक्षक आरती नांद्रेकर, संस्थेचे विराज सरनाईक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.