मुरगूडला शिवाजी महाराज पुतळ्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:18 IST2020-12-07T04:18:50+5:302020-12-07T04:18:50+5:30

मुरगूड नगरपरिषदेसमोरील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानामध्‍ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळा उभारण्‍याचे काम मंडलिक युवा प्रतिष्‍ठानच्‍या पुढाकाराने लोकवर्गणीतून होणार ...

Initiative of municipal employees for Shivaji Maharaj statue at Murgud | मुरगूडला शिवाजी महाराज पुतळ्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांचा पुढाकार

मुरगूडला शिवाजी महाराज पुतळ्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांचा पुढाकार

मुरगूड नगरपरिषदेसमोरील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानामध्‍ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळा उभारण्‍याचे काम मंडलिक युवा प्रतिष्‍ठानच्‍या पुढाकाराने लोकवर्गणीतून होणार आहे. यासाठी वीरेंद्र मंडलिक यांनी नागरिकांना आर्थिक सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी घेतलेला पुढाकार कौतुकास पात्र आहे.

सर्व कर्मचारी, अधिकारी यांनी जमवलेल्या एक लाख रुपयांचा धनादेश मंडलिक युवा प्रतिष्‍ठानचे अध्‍यक्ष वीरेंद्र मंडलिक व नगराध्यक्ष राजेखान जमादार यांचेकडे सुपूर्द केला. यावेळी जयवंत गोधडे, रणजित निंबाळकर, प्रकाश पोतदार, अनिकेत सूर्यवंशी, स्‍नेहल पाटील, प्राजक्‍ता पिंपळे, दिलीप कांबळे, रमेश मुन्‍ने, बाळासो शेळके, भिकाजी कांबळे, स्‍वप्निल बुचडे, मारुती शेट्टी, अमोल गव्‍हारे, विनायक रणवरे, अमर कांबळे, विजय मोरबाळे, बबन बारदेस्कर, तानाजी कांबळे, मोहन कांबळे उपस्थित होते.

फोटो ओळ : मुरगूड शहरात उभ्या राहणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी एक लाखाचा धनादेश पालिका कर्मचाऱ्यांनी वीरेंद्र मंडलिक व नगराध्यक्ष राजेखान जमादार यांच्याकडे सुपूर्द केला.

Web Title: Initiative of municipal employees for Shivaji Maharaj statue at Murgud