शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

आसुर्लेत जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते आधार प्रमाणिकरणाचा प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 11:33 IST

राज्य सरकारच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत आसुर्ले (ता. पन्हाळा) व हेर्ले (ता. हातकणंगले) येथे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते सोमवारी आधार प्रमाणिकरणाचा प्रारंभ करण्यात आला. जिल्ह्यातील ५० हजार ६१८ पात्र शेतकऱ्यांच्या याद्या चार दिवसांत उपलब्ध होतील, असे जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले.

ठळक मुद्देमहात्मा फुले कर्जमुक्ती योजना चार दिवसांत ५० हजार ६१८ शेतकऱ्यांच्या याद्या

कोल्हापूर : राज्य सरकारच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत आसुर्ले (ता. पन्हाळा) व हेर्ले (ता. हातकणंगले) येथे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते सोमवारी आधार प्रमाणिकरणाचा प्रारंभ करण्यात आला. जिल्ह्यातील ५० हजार ६१८ पात्र शेतकऱ्यांच्या याद्या चार दिवसांत उपलब्ध होतील, असे जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले.आसुर्ले येथील ११६ पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर उपलब्ध आहे. भैरव विकास संस्थेत झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आधार प्रमाणिकरणाचा प्रारंभ करत शेतकऱ्यांना पोहोच पावत्यांचे वितरणही केले. पात्र याद्यांमध्ये काही त्रुटी आढळल्यास त्यांची त्या-त्या स्तरांवर निर्गत केल्या जातील.

उर्वरित याद्या शुक्रवार (दि. २८)पर्यंत येणार असून या याद्या ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, विकास संस्था तसेच जिल्हा बँकेच्या संबंधित शाखेत लावल्या जातील, असे देसाई यांनी सांगितले. जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी या योजनेची सविस्तर माहिती दिली. सरपंच भगवान पाटील यांनी स्वागत केले.यावेळी पन्हाळ्याचे प्रांताधिकारी अमित माळी, तहसीलदार रमेश शेंडगे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, बॅँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने, भैरव संस्थेचे अध्यक्ष संपतराव पाटील, सहाय्यक निबंधक शिरीष तळकेरी, उपसरपंच संभाजी पाटील, अशोक जाधव, संतोष धुमाळ आदी उपस्थित होते.जिल्ह्यासाठी ३७२ कोटी मिळणारमहात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत ५० हजार ६१८ शेतकरी पात्र ठरले आहे. त्यांच्या कर्जखात्यावर ३७२ कोटी वर्ग करून ते कर्जमुक्त होणार आहेत.कर्जमुक्तीबद्दल शेतकऱ्यांकडून समाधानकर्जमुक्ती आधार प्रमाणिकरणानंतर, शेतकरी बाबासाहेब जाधव, खंडू पाटील व रेखा कुंडलिक दुगुले यांनी समाधान व्यक्त केले.

 

 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर