ब्रिटनहून आलेल्या ८ जणांची माहिती मिळाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:25 IST2020-12-31T04:25:18+5:302020-12-31T04:25:18+5:30

कोल्हापूर : ब्रिटनहून आलेल्या आणि पत्ता सापडत नसलेल्या ८ जणांची माहिती शोधून काढण्यात आली आहे. त्यामध्ये ...

Information was received from 8 people from Britain | ब्रिटनहून आलेल्या ८ जणांची माहिती मिळाली

ब्रिटनहून आलेल्या ८ जणांची माहिती मिळाली

कोल्हापूर : ब्रिटनहून आलेल्या आणि पत्ता सापडत नसलेल्या ८ जणांची माहिती शोधून काढण्यात आली आहे. त्यामध्ये हातकणंगले तालुक्यातील ७, तर करवीर तालुक्यातील एकाचा समावेश आहे.

२५ नोव्हेंबरपासून कोल्हापूर जिल्ह्यात ब्रिटनहून ६२ जण आले होते. मात्र, यातील ५४ जणांची माहिती जिल्हा व आरोग्य प्रशासनाला उपलब्ध झाली होती. मात्र, हातकणंगले तालुक्यातील १० पैकी ७ जणांची, तर करवीर तालुक्यातील एका नागरिकाची माहिती मिळत नव्हती. तालुका पातळीवरूनही माहिती घेतली जात होती. मंगळवारी दुपारपर्यंत ही माहिती मिळत नव्हती. अखेर रात्री उशिरा त्यांची माहिती प्रशासनाला मिळाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे एकूण ६२ जणांची माहिती प्रशानाकडे उपलब्ध झाली आहे.

Web Title: Information was received from 8 people from Britain