शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नागरी बँकांमधील लॉकर्सची माहिती आता ऑनलाइन, रिझर्व्ह बँकेचा आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 14:18 IST

वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिक दागदागिन्यांसह इतर मौल्यवान वस्तू घरात ठेवण्याऐवजी बँकांच्या लॉकर्समध्ये ठेवणे अधिक पसंत करत आहेत

राजाराम लोंढेकोल्हापूर : राष्ट्रीयीकृत बँकांप्रमाणे नागरी सहकारी बॅकांमधील लॉकर्सची माहिती आता ग्राहकांसाठी ऑनलाइन जाहीर करण्याचा आदेश रिझर्व्ह बँकेने दिला आहे. त्याचबरोबर लॉकर्स मिळावे म्हणून बँकांकडे प्रतीक्षेत असलेल्या ग्राहकांची यादीही जाहीर करणे बंधनकारक राहणार आहे. नवीन नियमाची तातडीने अंमलबजावणी करण्याची सूचनाही बँकांना दिली आहे.वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिक दागदागिन्यांसह इतर मौल्यवान वस्तू घरात ठेवण्याऐवजी बँकांच्या लॉकर्समध्ये ठेवणे अधिक पसंत करत आहेत. राष्ट्रीयीकृत बँकांप्रमाणेच नागरी बँकांनाही त्यांच्याकडील लॉकर्सची संख्या, त्यातील कितींचा वापर झाला, मोकळे किती, याची माहिती खुली करण्याचा आदेश दिला आहे. या निर्णयामुळे ग्राहकांना रिझर्व्ह बँकेच्या वेबसाइटवर कोणत्या बँकेची लॉकर्स मोकळी आहेत, याची माहिती तातडीने मिळणार आहे. 

लॉकर्सला पुराचाही फटका

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत जुलैमध्ये आलेल्या महापुरातून बँकांचे लॉकर्सही सुटलेले नाहीत. लॉकर्स पाण्याखाली गेल्याने दोन्ही जिल्ह्यांतील बँकांंच्या कोट्यावधींच्या नोटा खराब झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पाऊस व पुरापासून सुरक्षित लॉकर्सची बांधणी करण्याच्या सूचनाही रिझर्व्ह बँकेने केल्या आहेत.लॉकर्सच्या भाड्याला बँकांना मोकळीकलॉकर्सचे भाडे किती असावे, याबाबत बँकांना मोकळीक दिली आहे. नागरी बँकांच्या तुलनेत राष्ट्रीयीकृत बँकांच्या लॉकर्सचे भाडे दुप्पट आहे.

लॉकर्सबाबत या राहणार नियमावली-

- लॉकर उघडल्यावर संबंधित व्यक्तीला मेसेज जाणार आहे. त्यामुळे अनधिकृत व्यवहार टाळता येणार आहे.- लॉकरमध्ये वस्तू ठेवताना संबंधित व्यक्तीने वारस देणे बंधनकारक राहणार.- न्यायालयाने आदेश दिल्यानंतरच ‘ईडी’सह इतर राष्ट्रीय तपास यंत्रणांना लॉकर्स उघडता येणार.- लॉकर्सचे भाडे थकले, तर त्याचा ताबा आपोआपच बँकेकडे जाणार.

...असे आहेत लॉकर्सचे वार्षिक भाडेलहान - ५००मध्यम - ८००मोठे - १,२००

लॉकर्सबाबत रिझर्व्ह बँकेकडे तक्रार गेल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. यामुळे बँकिंग यंत्रणेला एक शिस्त लागण्यास मदत होईल. - संजयकुमार मगदूम (मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राथमिक शिक्षक बँक)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbankबँक