शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘मन की बात’द्वारे भाजपने दिली मोदींच्या कार्याची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 14:12 IST

कोल्हापूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील तिसरा ‘ मन की बात’ कार्यक्रम रविवारी झाला. भाजपतर्फे शहरातील ...

ठळक मुद्दे‘मन की बात’द्वारे भाजपने दिली मोदींच्या कार्याची माहिती शहरातील सात ठिकाणी झाला कार्यक्रम

कोल्हापूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील तिसरा ‘मन की बात’ कार्यक्रम रविवारी झाला. भाजपतर्फे शहरातील सात मंडलांमध्ये हा कार्यक्रम घेऊन पंतप्रधान मोदी यांच्या कार्यासह ते राबवित असलेल्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली. ११ सप्टेंबरपासून स्वच्छता ही सेवा हे अभियान प्रत्येक प्रभागांमध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घ्यावे, असे आवाहन महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी यावेळी केले.प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी हा कार्यक्रम होत असतो. त्यानुसार भाजपतर्फे शहरातील शिवाजी पेठ येथे नेसरीकर वाडा, मंगळवार पेठ येथे सणगर गल्ली तालीम, उत्तरेश्वर पेठ येथे रेगे तिकटी, शाहूपुरी येथे शाहूपुरी तालीम, राजारामपुरी मंडलमध्ये करवीर प्रशाला विक्रमनगर, लक्ष्मीपुरी मंडल येथे भाजपा कार्यालय आणि कसबा बावडा येथे लाईन बाजार चौक येथे हा कार्यक्रम घेण्यात आला. या ठिकाणी चिकोडे यांनी भेट देऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. २ आॅक्टोबरला महात्मा गांधी यांची १५० वी जयंती होत असून, यानिमित्ताने ११ सप्टेंबरपासून प्रत्येकाने वैयक्तिक सहभागाने करावयाचे स्वच्छता अभियान, संपूर्ण प्लास्टिक मुक्ती संकल्प, वन्यजीव संवर्धन कार्यक्रम आणि राष्ट्रीय खेल दिवसपासून सुरू होणाऱ्या हेल्दी इंडिया अभियानाची माहिती या कार्यक्रमाच्या माध्यमातून मोदी यांनी दिली.यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, आमदार अमल महाडिक, अशोक देसाई, विजय जाधव, दिलीप मेत्राणी, आर. डी. पाटील, नगरसेवक अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे, मारुती भागोजी, राजाराम शिपुगडे, मामा कोळवणकर, संतोष माळी, भरत काळे, चंद्रकांत घाटगे, भारती जोशी, सुलभा मुजुमदार, प्रभा इनामदार, आप्पा लाड, नचिकेत भुर्के , विजय आगरवाल, हेमंत कांदेकर, आदी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Man ki Baatमन की बातkolhapurकोल्हापूरBJPभाजपा