शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

चित्रपट महामंडळाच्या सभासदांची माहिती आॅनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 15:38 IST

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कामकाजाचे आणि सभासदांच्या माहितीचे डिजीटायझेशनचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात एका क्लिकवर मराठी चित्रपट व्यावसायिकांची माहिती उपलब्ध होणार असल्याची माहिती अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली. गेल्या तीन वर्षात वाढलेले सभासद आणि खर्चाचे योग्य नियोजन यामुळे महामंडळाच्या एकूण तब्बल आठ कोटींच्या ठेवी असल्याचेही त्यांनी सांगितले. ​​​​​​​

ठळक मुद्देचित्रपट महामंडळाच्या सभासदांची माहिती आॅनलाईनआठ कोटींच्या ठेवी : मेघराज राजेभोसले

कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कामकाजाचे आणि सभासदांच्या माहितीचे डिजीटायझेशनचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात एका क्लिकवर मराठी चित्रपट व्यावसायिकांची माहिती उपलब्ध होणार असल्याची माहिती अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली. गेल्या तीन वर्षात वाढलेले सभासद आणि खर्चाचे योग्य नियोजन यामुळे महामंडळाच्या एकूण तब्बल आठ कोटींच्या ठेवी असल्याचेही त्यांनी सांगितले.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची तीन वर्षांची एकत्रित सभा रविवारी (दि.२७) मार्केट यार्ड येथील सांस्कृतिक भवनमध्ये होत आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या तीन वर्षातील कार्याचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. ते म्हणाले, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळे ही देशातील सर्वात मोठी चित्रपट व्यावसायिकांची संघटना असून सभासदांची माहिती आॅनलाईन पाहता येणार आहे. सध्या १८ हजार सभासदांची माहिती यात फिड असून उर्वरीत कामही आता अंतिम टप्प्यात आले आहे.

महामंडळातर्फे सध्या ७८ कलाकारांना १ हजार रुपये मानधन दिले जात असून हा लाभ हयात असेपर्यंंत मिळणार आहे. ही संख्या ५००वर नेण्याची इच्छा असून त्यासाठी दीड कोटींची तरतुद असून दरवर्षी १० लाखांनी वाढ करण्यात येणार आहे. महामंडळाच्या मागणीनंतर शासनाने चित्रनगरीचे भाडे दर कमी केले असून दुसऱ्या टप््यासाटी सुकाणु समिती नियुक्त केली आहे.

कोल्हापुरातील प्रभात तुतारी व कॅमेरा स्तंभाचे पर्यटनस्थळ होण्याच्या दृष्टीने नुतनीकरण व देखभाल करण्यात येणार आहे. त्यासाठी १० लाखांची तरतुद केली आहे. मुंबईत भूमिका करण्यासाठी आलेल्या स्त्री व पुरुष कलाकारांना राहण्यासाठी दोन स्वतंत्र फ्लॅट भाड्याने घेण्यात आले आहेत.परिषदेस उपाध्यक्ष धनाजी यमकर, कार्यवाह बाळा जाधव, सतिश बिडकर, संजय ठुबे, अ‍ॅड. प्रशांत पाटील, अ‍ॅड, मंदार जोशी, अरुण चोपदार, अर्जून नलवडे, सुरेंद्र पन्हाळकर, रविंद्र बोरगांवकर आदी उपस्थित होते.

महामंडळ वितरणात उतरणार...मराठी चित्रपटांना चित्रपटगृह मिळत नाहीत त्यामुळे चित्रपट महामंडळ स्वत: चित्रपटाच्या वितरणात उतरणार आहे. या शिवाय बस्थानक व तालुक्याच्या ठिकाणी शंभर ते दोनशे प्रेक्षक संख्येनुसार मिनिप्लेक्स सुरु करण्यात यावे अशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. हे मिनीप्लेक्स चालवण्यासाठी महामंडळ तयार आहे.

कोल्हापुरचे कार्यालय होणार अद्ययावतकोल्हापुर हे महामंडळाचे मुख्य कार्यालय असल्याने ते नव्या जागेत अद्ययावत सुविधांनी सुसज्ज असावे असे संचालक मंडळाचे मत आहे. त्यासाठी स्वतंत्र जागा खरेदी अथवा भाडेतत्वावर घेवून तेथे नवे कार्यालय उभारण्याचा विचार असून हा विषय सभेत प्रामुख्याने चर्चिला जाणार आहे.

महामंडळाने केलेली कामे१) २०१८ सालात १ कोटी ३४ लाख ९९ हजारांचा नफा२) शासनाकडे थकित असलेल्या १६ कोटींच्या अनुदानापैकी १० कोटींचे अनुदान निर्मात्यांच्या खात्यात३) चित्रीकरणासंबंधी महसूल विभागाच्या अटी शिथील४) १ कोटींपेक्षा जास्त नफा असलेल्या चित्रपटांना अनुदान नाही५) निर्मात्यासांठी कार्यशाळा६) सातारा, औरंगाबाद, बीड, नागपूर येथे शाखा विस्तार७) तीन वर्षात सभासद संख्येत वीस हजारांनी वाढ८) बोगस आॅडीशन, शॉर्ट फिल्म फेस्टिवलची दुकानदारी रोखली९) नवीन घटनेत दुरचित्रवाणीचाही समावेश१०) मराठी चित्रपटांना जीएसटीत सवलत

सभासद संख्याअ वर्ग सभासद : १९ ५३८ब वर्ग सभासद : १४, ९३९आजीव सभासद : १ हजार २३३सन्माननीय सभासद : १२१ 

टॅग्स :cultureसांस्कृतिकkolhapurकोल्हापूर