शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यातील कोविड घोटाळ्याच्या तपासाची माहिती द्या, उच्च न्यायालयाचे जिल्हा पोलिसप्रमुखांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 13:15 IST

हे आहेत आक्षेप

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोना काळात झालेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारीचा काय तपास केला याची माहिती १ ऑक्टोबर २०२४ पर्यंत द्या असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने झालेल्या या काळातील खरेदीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. या सर्व प्रकरणांमध्ये अनेक राजकीय नेत्यांचीही भूमिका संशयास्पद राहिल्याने वरील तारखेला होणाऱ्या पुढच्या सुनावणीकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.कोरोना काळात विविध वैद्यकीय उपकरणे, औषधे खरेदी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती कार्यरत होती. परंतु, तत्कालीन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी खरेदीचे संपूर्ण अधिकार हे जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांना दिले. त्यानंतर सुमारे १५० कोटींहून अधिक रुपयांची खरेदी झाली. यामध्ये ३५ कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार २५ फेब्रुवारी २०२२ रोजी विश्वजित जाधव, गौरव पाटील, जितेंद्र यादव (रा. कोल्हापूर) या तिघांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली होती. यामध्ये अमन मित्तल, तत्कालीन जिल्हा लेखा व्यवस्थापक नितीन लोहार, औषध निर्माण अधिकारी युवराज बिल्ले यांची नावेही घालण्यात आली होती. तक्रार अर्ज न घेतल्याने त्यांनी २१ मार्च २०२२ रोजी तत्कालीन जिल्हा पोलिसप्रमुख शैलेश बलकवडे यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती.

दरम्यान, या तिघांनी याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर ९ सप्टेंबरला सुनावणी झाली असून, आतापर्यंत या प्रकरणाचा काय तपास झाला आणि त्याची सद्य:स्थिती काय आहे याची माहिती पुढच्या सुनावणीवेळी द्यावी, असे आदेश न्यायमूर्तींनी दिले आहेत. १ ऑक्टोबर २४ रोजी ही सुनावणी होणार आहे. याचिकाकर्त्यांच्यावतीने ॲड जे. जे. बारदेस्कर यांनी काम पाहिले.

हे आहेत आक्षेपआपत्कालीन परिस्थितीतील कलमे लावून निविदा न काढता वस्तूंची खरेदी, त्यांच्या नोंदी न सापडणे, तीन अधिकाऱ्यांच्या सहीने कंपन्यांना रक्कम अदा करणे आवश्यक असताना धनादेशावर दोनच अधिकाऱ्यांच्या सह्या, अनेक वस्तू पोहोच झाल्याच्या नोंदी नसणे असे अनेक आक्षेप याचिकाकर्त्यांनी घेतले आहेत. बेड, ऑक्सिमीटर, व्हेन्टिलेटर, पल्स मॉनिटर, टेम्परेचर गन, सलाईन स्टॅंड, एक्स रे मशिन्स यामध्ये हा गैरप्रकार झाल्याची ही तक्रार करण्यात आली होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलfraudधोकेबाजीPoliceपोलिसHigh Courtउच्च न्यायालय