उजळाईवाडी तंटामुक्त समितीच्या कामकाजाची माहिती द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:17 IST2021-06-19T04:17:03+5:302021-06-19T04:17:03+5:30
उचगाव : उजळाईवाडी तंटामुक्ती समितीचे कामकाज, सदस्यांची यादी, गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात ग्रामपंचायतीकडून दिले गेलेले अध्यक्षांच्या निवडीचे पत्र ...

उजळाईवाडी तंटामुक्त समितीच्या कामकाजाची माहिती द्या
उचगाव : उजळाईवाडी तंटामुक्ती समितीचे कामकाज, सदस्यांची यादी, गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात ग्रामपंचायतीकडून दिले गेलेले अध्यक्षांच्या निवडीचे पत्र व आजअखेर झालेल्या मासिक सभेचे प्रोसिडिंग याची माहिती द्यावी, अशी मागणी माजी सरपंच काकासाहेब पाटील, नारायण माने, राजू माने व विश्वास पाटील यांनी ग्रामसेवक व सरपंच यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, येथील विरोधी आघाडीच्या ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामसेवकाच्या विरोधात खडा पहारा आंदोलन केले. याविषयी ग्रामस्थांनी ग्रामसेवकाच्या कामकाजाची विचारणा करून कामात व वेळेत सुधारणा करण्याची सूचना केली. यावर ग्रामसेवक बी. डी. कापसे यांनी कामात दिरंगाई होणार नाही, अशी कबुली दिली. विरोधी आघाडीने केलेले आंदोलन हे दिशाभूल करण्यासाठी असून माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत कापसे यांनी आरोप फेटाळले.
कोट :
ग्रामसेवक बी. डी. कापसे यांनी कोरोना संसर्गजन्य काळात चांगली कामगिरी केली आहे. तसेच आताही त्यांनी गावात कोरोना प्रतिबंध उपाययोजनेच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्यावतीने कोरोना संसर्गजन्य परिस्थितीत विनामास्क फिरणाऱ्या लोकांवर कारवाई करत ७० हजारांचा दंड वसूल केला आहे.
सुवर्णा माने, सरपंच, उजळाईवाडी
कोट : लोकशाहीत प्रत्येकाला माहिती मागण्याचा अधिकार असून ज्या दहा- बारा ग्रामस्थांनी तंटामुक्त समितीबाबत माहिती मागविली आहे. ती त्यांना दिली जाईल. उजळाईवाडीकरांनी ग्रामसभेत प्रचंड बहुमताने माझी निवड केली आहे. त्या विश्वासास पात्र राहून आजपर्यंत काम केले आहे. पण निवडीनंतर तीन वर्षांनंतर निवडीच्या कागदपत्रांची मागणी पाहता त्यांच्या हेतूबाबत शंका येते.
सचिन पाटील, अध्यक्ष तंटामुक्त समिती, उजळाईवाडी.
फोटो :१८ उजळाईवाडी निवेदन
उजळाईवाडी ग्रामपंचायत तंटामुक्ती समितीच्या कामकाजाची माहिती द्या, अशी मागणी माजी सरपंच काकासाहेब पाटील,नारायण माने, राजू माने, विश्वास पाटील यांनी ग्रामसेवकांकडे निवेदनाद्वारे केली.