शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

सीपीआरमधील नवजात अर्भक मृत्यू प्रमाण घटले -आरोग्य विभागाचे यश : तत्पर आरोग्यसेवा, उपचार पद्धतीतील बदलांचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 01:07 IST

कोल्हापूर : ग्रामीण भागातील तातडीची आरोग्य सेवा, उपचार पद्धतीत झालेल्या बदलांमुळे छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) गेल्या वर्षभरात नवजात अर्भक मृत्यूच्या प्रमाणात घट झाली

गणेश शिंदे ।कोल्हापूर : ग्रामीण भागातील तातडीची आरोग्य सेवा, उपचार पद्धतीत झालेल्या बदलांमुळे छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) गेल्या वर्षभरात नवजात अर्भक मृत्यूच्या प्रमाणात घट झाली आहे. गेल्या वर्षभरात २५१ अर्भकांचा मृत्यू झाला असून, २०१६ च्या तुलनेत त्यामध्ये ३२ ने घट झाली आहे.

गर्भवती महिलेला वेळेत न मिळणारी आरोग्य सेवा, प्रसूतीदरम्यान मिळणारी तोकडी उपचारपद्धती यामुळे नवजात अर्भक मृत्यूचे प्रमाण वाढले होते. अर्भक मृत्यू हे राज्याच्या आरोग्य विभागासमोरील आव्हान होते. त्यावर मात करण्याचे काम छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाने केले आहे.

महाराष्ट्रात नवजात अर्भकांचा मृत्यू कमी होण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. सातत्याने यासाठी आरोग्य विभाग विविध योजना, आरोग्य सेवा देत आहे. कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयामधील अद्ययावत उपकरणे, २४ तास सेवेत असलेले बालरोगतज्ज्ञ, परिचारिका, सर्व महत्त्वाच्या तपासण्या, औषधांची मोफत उपलब्धता, आदी नवजात अर्भकांचा मृत्यूदर कमी होण्याची प्रमुख कारणे आहेत. नवजात शिशू विभागाची स्थानिक रोटरी क्लब आॅफ कोल्हापूर हेरिटेज यांनी ‘ककुन’ या प्रकल्पाकरिता निवड करून हा विभाग अद्ययावत करण्याकरिता मोलाचा हातभार लावला आहे.सन २०१६ या वर्षात १९६२ नवजात अर्भके सीपीआरमध्ये दाखल झाली. त्यातील २८३ मृत झाली. त्याचे प्रमाण १४.४ टक्के आहे.

गेल्यावर्षी १९७१ नवजात अर्भके दाखल झाली. त्यामध्ये २५१ अर्भके मृत झाली. नवजात शिशू विभाग सन १९९७ ला केवळ चार-पाच अर्भकांच्या उपचार करण्यापुरता चालू करण्यात आलेला होता. स्थानिक रोटरी क्लब आॅफ कोल्हापूर हेरिटेज यांनी नवजात शिशू विभागाची ‘ककुन’ या प्रकल्पाकरिता निवड करून हा विभाग अद्ययावत करण्याकरिता मोलाचा हातभार लावला आहे.

या विभागामध्ये सध्या पाच व्हेंटिलेटर्स, तीन सिपॅप मशिन्स (प्रामुख्याने प्रीमॅच्युअर अर्भकांकरिता लागणारे व्हेंटिलेटर्स), २५ इन्क्युलेटर्स, मल्टिपॅरा, मॉनिटर्स, सिरिज पंप, फोटो थेरपी उपचार, सेंट्रल आॅक्सिजन, सेंट्रल सेक्शन आदी खासगी संस्थांमध्ये उपलब्ध असलेल्या सर्व अद्ययावत सुविधा उपलब्ध आहेत. महिन्याला अंदाजे १५० ते २२५ बालके दाखल होतात व त्यातील दहा ते १५ टक्के बाळांना वाचविण्यात यश येत नाही. ही आकडेवारी राज्यातील इतर शासकीय तसेच खासगी रुग्णालयामध्ये हा मृत्यूदर ३० ते ३५ टक्के जास्त आहे, असे प्रशासनाने सांगितले.गर्भवतीने घ्यावयाची काळजी....अतिश्रम टाळले पाहिजे, पोषण संपूर्ण आहार घेतला पाहिजे, स्वच्छता राखली पाहिजे.वैद्यकीय अधिकाºयांकडून होणाºया रक्त तपासण्या, सोनोग्राफी, रक्तदाब तपासणी, एच.आय.व्ही तपासणी व नियमित लसीकरण. 

नवजात अर्भक मृत्यू प्रमाण रोखणे हे आरोग्य विभागासमोर हे एक आव्हान आहे. त्यासाठी गेले वर्षभर प्रशासनाने जनजागृतीच्या माध्यमातून मृत्यू कमी करण्याचा प्रयत्न केला.- डॉ. शिशीर मिरगुंडे, वैद्यकीय अधीक्षक, सीपीआर, कोल्हापूर.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलkolhapurकोल्हापूर