पार्वती वसाहतीमुळे औद्योगिक क्रांती : राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:26 IST2021-09-26T04:26:25+5:302021-09-26T04:26:25+5:30

यड्राव : पार्वती औद्योगिक वसाहतीमध्ये नवउद्योजकांना उद्योग उभारण्यासाठी अल्पदरात जमिनी उपलब्ध करून दिल्या, २६६ एकर ...

Industrial Revolution due to Parvati Colony: Minister of State Rajendra Patil-Yadravkar | पार्वती वसाहतीमुळे औद्योगिक क्रांती : राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर

पार्वती वसाहतीमुळे औद्योगिक क्रांती : राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर

यड्राव : पार्वती औद्योगिक वसाहतीमध्ये नवउद्योजकांना उद्योग उभारण्यासाठी अल्पदरात जमिनी उपलब्ध करून दिल्या, २६६ एकर जागेमध्ये अनेक नवउद्योजकांनी सुरू केलेले छोटे- मोठे उद्योग अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू असून, या औद्योगिक वसाहतीमुळे शिरोळ हातकणंगले परिसरामध्ये औद्योगिक क्रांती निर्माण झाली आहे, असे गौरवोद्गार आरोग्य राज्यमंत्री आणि पार्वती औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी काढले.

पार्वती औद्योगिक वसाहतीच्या ४० व्या ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून यड्रावकर बोलत होते.

औद्योगिक वसाहतीचे संस्थापक सहकारमहर्षी स्व. शामराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून या सभेच्या कामकाजास सुरुवात झाली. गजानन सुलतानपुरे यांनी स्वागत केले. अहवाल सालामध्ये दिवंगत झालेले संस्थेचे सभासद, संचालक, कामगार, ज्ञात-अज्ञात व सर्व क्षेत्रांतील मान्यवरांना उपाध्यक्ष महावीर खवाटे यांनी श्रद्धांजली वाहिली, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित पाटील यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या नोटीसचे व विषयपत्रिकेवरील विषयांचे वाचन केले. यातील सर्व विषय मंजूर करण्यात आले.

यावेळी संस्थेचे संचालक आणि जयसिंगपूरचे उपनगराध्यक्ष संजय पाटील- यड्रावकर, ताजोद्दीन तहसीलदार, महावीर पाटील, किरण बरगाले, सुवर्णा पाटील, रत्नमाला गांधी, जैनूल बागवान, चंद्रकांत कांबळे, संजय बिडला, शरद इन्स्टिट्यूटचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डायरेक्टर अनिल बागणे, आदित्य राजेंद्र पाटील- यड्रावकर, प्रकाश आकिवाटे यांच्यासह सभासद व उद्योजक उपस्थित होते. संचालक शाबगोंडा पाटील यांनी आभार मानले, तर सूत्रसंचालन बबन यादव यांनी केले.

फोटो – 25092021-जेएवाय-01

फोटो ओळी :

यड्राव (ता. शिरोळ) येथे पार्वती औद्योगिक वसाहतीच्या ऑनलाइन वार्षिक सभेत उपाध्यक्ष महावीर खवाटे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर, गजानन सुलतानपुरे, बाळासाहेब केटकाळे यांच्यासह संचालक उपस्थित होते.

Web Title: Industrial Revolution due to Parvati Colony: Minister of State Rajendra Patil-Yadravkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.