इंद्रजित मोहितेस सुवर्णपदक

By Admin | Updated: December 27, 2014 00:18 IST2014-12-27T00:17:44+5:302014-12-27T00:18:47+5:30

खुल्या ५८ व्या नेमबाजी स्पर्धेत २२ प्रोन पोझिशन प्रकारात

Indrajit Mohite Gold Medal | इंद्रजित मोहितेस सुवर्णपदक

इंद्रजित मोहितेस सुवर्णपदक

कोल्हापूर : न्यू पॅलेस येथील इंद्रजित दिलीपसिंह मोहिते याने पुणे, बालेवाडी येथे सुरू असलेल्या खुल्या ५८ व्या नेमबाजी स्पर्धेत २२ प्रोन पोझिशन प्रकारात सांघिक सुवर्णपदक पटकावले. त्याने महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले.
फेब्रुवारी २०१५ मध्ये केरळ येथे होणाऱ्या भारतीय पूर्व संघासाठी त्याची निवड झाली आहे. त्याला महाराष्ट्र रायफल असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले. इंद्रजित हा गेली १२ वर्षे नेमबाजी स्पर्धेत भाग घेत आहे. त्याने आतापर्यंत सुमारे १२ सुवर्णपदके मिळवली आहेत. प्रसिद्ध सराफ दिलीपसिंह मोहिते यांचा तो मुलगा आहे.

Web Title: Indrajit Mohite Gold Medal