कोल्हापूर : कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर रंगलेल्या टी-ट्वेन्टी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताने पाकिस्तानवर ६१ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. १८ व्या षटकात पाकिस्तानचा संघ ११४ धावांत गारद झाला. सामन्याचा निकाल लागताच शहरातील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात कोल्हापुरकरांनी मोठी गर्दी करत जल्लोष केला.
हातात तिरंगा घेत तरुणाईने ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि जल्लोषमय वातावरणामुळे चौकात उत्सवाचे स्वरूप आले होते. महिला, तरुणी तसेच लहान मुलेही तिरंगा फडकवत या आनंदोत्सवात सहभागी झाले होते. मोबाईल कॅमेऱ्यावर काहींनी व्हिडिओ, रिल्स केले, तर काहींनी सेल्फी काढून आनंद साजरा केला.मोबाईल कॅमेऱ्यावर काहींनी व्हिडिओ, रिल्स केले, तर काहींनी सेल्फी काढून आनंद साजरा केला.रविवारी रात्री उशिरापर्यंत हा जल्लोष सुरू होता. काही युवकांनी ध्वनीयंत्रणा (साउंड सिस्टीम) आणण्याचा प्रयत्न केला; मात्र कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी त्यास मनाई केली. तासभर या ठिकाणी एकच जल्लोष आणि आतषबाजी झाली. जल्लोषानंतर पोलिसांनी येथील गर्दी पांगवत परिसर मोकळा केला. सुमारे तासभर या ठिकाणी एकच जल्लोष आणि आतषबाजी झाली. परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी सतर्कता बाळगली. भारताच्या या दमदार विजयामुळे कोल्हापूरकरांमध्ये उत्साहाचे आणि अभिमानाचे वातावरण पसरले होते.
पोलिसांची अरेरावी -बिंदू चौक आणि अयोध्या टॉकीजकडून महापालिका चौकात येण्यासाठी पोलिसांनी तुटपुंजे बॅरिकेडस लावले होते. त्यांच्या नजरेसमोरुन दुचाकीवरुन तिपल सीट जात असतानाही त्यांना ते हटकत नव्हते, मात्र इतरांवर अरेरावी करुन ट्रेझरी कार्यालयासमोरुन जाण्यास भाग पाडत होते.
Web Summary : India's victory over Pakistan in the T20 World Cup sparked celebrations in Kolhapur. Enthusiastic crowds gathered at Shivaji Maharaj Chowk with flags and drums. Police maintained order amidst the festivities, ensuring public safety throughout the night.
Web Summary : टी20 विश्व कप में भारत की पाकिस्तान पर जीत के बाद कोल्हापुर में जश्न मनाया गया। शिवाजी महाराज चौक पर उत्साही भीड़ ने झंडे और ढोल के साथ प्रदर्शन किया। पुलिस ने पूरी रात कानून व्यवस्था बनाए रखी।