भारतीय मजदूर संघाच्या अध्यक्षपदी एस. एन. पाटील
By Admin | Updated: July 26, 2016 00:20 IST2016-07-25T23:57:56+5:302016-07-26T00:20:26+5:30
कार्यकारिणी जाहीर : उपाध्यक्षपदी सुशीला पाटील

भारतीय मजदूर संघाच्या अध्यक्षपदी एस. एन. पाटील
कोल्हापूर : भारतीय मजदूर संघाची जिल्हा कार्यकारिणी शनिवारी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये अध्यक्षपदी एस. एन. पाटील यांची, तर उपाध्यक्षपदी सुशीला पाटील यांची निवड करण्यात आली.
इतर पदाधिकाऱ्यांमध्ये सीताराम लाटणे, श्रीकांत पाटील, रमेश थोरात, सचिवपदी अभिजित केकरे, सहसचिव सागर यादव, तेजस मडिवाळ, कोषाध्यक्षपदी अपर्णा कोडगुले, सहकोषाध्यक्षपदी अमृत लोहार, संघटनमंत्रिपदी अॅड. अनुजा धरणगांवकर, कार्यालय प्रमुखपदी हृषिकेश मुडलगे यांची निवड करण्यात आली.
मजदूर संघाच्या ६१ व्या वर्धापनदिनानिमित्त मंगळवार पेठेतील दैवज्ञ बोर्डिंगशेजारील संघाच्या कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी एस. एन. पाटील होते.
यावेळी आयडीबीआय बँक कर्मचारी संघटना अध्यक्ष मुकुंदराव जोशी, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
अन्य कार्यकारिणी
पर्यावरण मंच प्रमुख :
पद्मजा देसाई
निमंत्रित : मुकुंद जोशी, भगवानराव खाडे, प्रमोद जोशी, सुधीर मिराशी, यशवंतराव मस्कर, अशोक पाटील, मोहन पाटील
कोल्हापूर जिल्हा इंजिनिअरिंग मजदूर संघाचे उद्योगप्रमुख : विनायक जोशी, मनिष परळे, रवींद्र एडके, रावसाहेब माने,
बॅँक कर्मचारी संघाचे प्रमुख : राजू मोहिते, योगीता मंत्री,
घरेलू कामगार संघाचे
प्रमुख : अनिता लोखंडे, माधुरी कांबळे, गगनबावडा तालुकाध्यक्ष : सतीश मोळे, करवीर तालुकाध्यक्ष :
डॉ. लक्ष्मण पाटील, बाबासाहेब दळवी, पन्हाळा तालुकाध्यक्ष : कृष्णात पाटील.