भारतीय संस्कृती उत्सव आजपासून
By Admin | Updated: January 18, 2015 00:37 IST2015-01-18T00:32:44+5:302015-01-18T00:37:11+5:30
भव्य शोभायात्रा : ‘एकाच छताखाली’ सुवर्ण संगम; देशभरातून गर्दी

भारतीय संस्कृती उत्सव आजपासून
कोल्हापूर : श्री क्षेत्र सिद्धगिरी मठ संचलित भारतीय संस्कृती उत्सवास उद्या (दि. १८)पासून कणेरीमठ (ता. करवीर) येथे प्रारंभ होत आहे. उद्या सकाळी दहा वाजता गांधी मैदान येथून निघणाऱ्या शोभायात्रेने या उत्सवास सुरुवात होणार असल्याची माहिती श्री क्षेत्र सिद्धगिरी मठाचे मठाधिपती काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
काडसिद्धेश्वर स्वामीजी म्हणाले, ‘भारत विकास संगम’चा चौथा संस्कृती उत्सव आयोजन करण्याची संधी कोल्हापूरकरांना मिळाली आहे. उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. उत्सवात किमान तीस हजार लोकांची व्यवस्था केली असून पाचशे स्टॉल उभे केले आहेत. गांधी मैदानातून सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, महापौर तृप्ती माळवी व खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते शोभायात्रेने उत्सवाची सुरुवात केली जाणार आहे.
यांचा होणार गौरव
शंकर भटकुर्की : भाविकांची पादत्राणे सांभाळून पंधरा लाख रुपये सामाजिक कार्याला देणारे.
के. एल. पांडे : ६५ हजार गाणी तोंडपाठ व २०० राग शोधून काढले)
सालमरद तिम्मका : मुले नसल्याने झाडांना मुले समजून संगोपन
भावेश भाटिया : अंध उद्योजक
रेणू गावस्कर : ज्येष्ठ समाजसेविका, पुणे
चेतन उचितकर : बाल अंध सामाजिक कार्यकर्ता व पाच देशांचा ब्रॅँड अॅम्बॅसडर
शंकर जी : आर्किटेक्चर, केरळ
दिनकर कांबळे : जीवनरक्षक
बाबूराव शेळके : तीनचाकी रिक्षापासून तीनशे ट्रकांपर्यंत मजल