शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

विश्वचषकासाठी कोल्हापुरी साज; नयनरम्य ‘लेझर शो’ची मेजवानी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2023 09:57 IST

अहमदाबादचे मैदान झगमगणार : ४० लेझरद्वारे होणार लाइट इफेक्ट

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील रविवारच्या अंतिम सामन्यादरम्यान जगातील सर्वांत मोठं स्टेडियम असणाऱ्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर कोल्हापूरचे तरुण ६० वॅट क्षमतेचे ४० लेझर मैदानावर लावून आख्ख्या जगाला ‘लेझर शो’ व लाइट इफेक्टचा झगमगाट दाखविणार आहेत. 

यापूर्वी कधीही एका वेळेला मैदानावर ४० लेझर कार्यान्वित झालेले नसल्यामुळे हा एक विक्रमच ते रचणार आहेत. या ‘लेझर शो’साठी योगेश चौधरी, अमित पाटील, रामकृष्ण वागराळे, सागर पाटील, अभिषेक हांडे, रोहित कदम, उदय साळोखे, विनोद हाजुराणी, रविकुमार, गणेश तटकरे यांची टीम तैनात आहे.

प्रेक्षकांसाठी पर्वणीडोळे दिपवणारी विद्युत रोषणाई डिम शो आणि ग्राफिक शो यामुळे क्रिकेटचे मैदान विविध रंगांच्या विजेच्या दिव्यांनी झगमगणार आहे. सामना पाहताना ही रोषणाई देखील प्रेक्षकांसाठी मुख्य आकर्षण राहणार आहे. दिल्लीतील  ‘हेड वे क्रिएशन’ या कंपनीसोबत कोल्हापुरातील तरुण हा शो सादर करणार आहेत.

आव्हाने स्वीकारत वाटचाललेझर शोच्या व्यवसायात २०११ मध्ये पडलेल्या या तरुणांनी आव्हाने स्वीकारत स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. यापूर्वी अयोध्या इथे दिवाळीसाठी राम मंदिर परिसरात, तसेच उज्जैन येथील महाकाल मंदिरात खास लेझर शो केला होता. याशिवाय दुबई येथील एका लग्नसमारंभामध्ये त्यांनी ६० लेझर लावले होते. 

टॅग्स :Team Indiaभारतीय क्रिकेट संघICC One Day World Cupवन डे वर्ल्ड कपIndia vs Australiaभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया