शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
2
"भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
3
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
4
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
5
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
6
Nexon EV Review: टाटाच्या नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
7
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
8
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
9
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
10
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
11
"मी अजून सिनेमा पाहिलाच नाहीये, कारण...", 'नाच गं घुमा'साठी मुक्ता बर्वेची पोस्ट
12
दोन कोटींच्या चंदन चाेरीतील मुख्य आरोपी शरद पवार गटाचा नगरसेवक
13
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
14
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
15
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
16
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
17
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
18
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
19
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
20
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?

कोल्हापूर ‘देवस्थान’च्या जमीन नोंदीसाठी स्वतंत्र कंपनी : समितीचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 12:33 AM

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडे असलेल्या जमिनींची माहिती समितीकडे नसल्याने आजवर हजारो एकर जमिनींचे गैरव्यवहार झाले आहेत. दुसरीकडे,

ठळक मुद्देगैरव्यवहार रोखण्यास, उत्पन्न वाढण्यास मदत होणार

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडे असलेल्या जमिनींची माहिती समितीकडे नसल्याने आजवर हजारो एकर जमिनींचे गैरव्यवहार झाले आहेत. दुसरीकडे, देवस्थानचे कोट्यवधींचे उत्पन्न बुडले आहे. मंदिरांची संपत्ती व जमिनींबाबतचा हा गलथान कारभार थांबून त्यांची समितीकडे व्यवस्थित नोंद व्हावी, कोणत्या मंदिरांचा व जमिनींचा कसा वापर केला जातो, या सगळ्यांची संपूर्ण माहिती मिळविण्यासाठी समितीतर्फे असे काम करणाऱ्या स्वतंत्र संस्थेची (कंपनी) नियुक्ती करण्यात येणार आहे.

देवस्थान समितीच्या अखत्यारीत ३०६४ मंदिरे व त्यांची व्यवस्था लावण्यासाठी म्हणून देण्यात आलेली २७ हजार एकर जमीन आहे. कोट्यवधींची ही मालमत्ता असली तरी आजवर समितीला तिचा उपयोग झालेला नाही. वहिवाटदारी व लिलाव या दोन पद्धतींनी या जमिनी शेकडो वर्षांपासून कुळांकडे कसायला देण्यात आल्या आहेत. त्या बदल्यात समितीला वर्षाला नाममात्र रुपये खंड भरणे अपेक्षित असते. मात्र, जमिनीच्या सात-बाºयावर देवाचे नाव असतानाही अधिकाºयांच्या संगनमताने नामवंत व्यक्तींनी जमिनी स्वत:च्या नावावर केल्या आहेत.

अशा रीतीने हजारो एकर जमिनी आणि संपत्तीची परस्पर लूट झाली आहे.देवस्थानला सात वर्षे अध्यक्षच नव्हता. शिवाय राजकीय लागेबांधे, कर्मचाऱ्यांचेही अंतर्गत व्यवहार, हितसंबंध या सगळ्या प्रकारांतून आजवर दोषींवर कारवाई झाली नाही. जुजबी नोटीस बजावण्यापलीकडे देवस्थानचा कारभार कधी गेलाच नाही. आता मात्र समितीचे कामकाज हाती घेतल्यानंतर अध्यक्ष महेश जाधव यांनी जमिनींची माहिती घ्यायला सुरुवात केली. त्यातून भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांची प्रकरणे उघडकीस आली आहेत.

समितीकडे कोणत्या मंदिराची किती एकर जमीन आहे, त्या जागेवर काय केले जाते, याची कर्मचाऱ्यांनाच माहिती नाही. माहिती असली तरी तिच्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळेच देवस्थान समितीच्या अखत्यारीत असलेल्या या मंदिरांची संपत्ती आणि जमिनींची माहिती मिळवून त्याच्या नोंदी ठेवण्याचे स्वातंत्र्य संस्थेला देण्यात येणार आहे. याबाबतचा ठराव समितीच्या मासिक बैठकीत करण्यात आला असून, त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सध्या समितीचा खंड बुडविणाऱ्या व बेकायदेशीर व्यवहार केलेल्या कुळांना नोटीस पाठविली जात आहे. तरीही परिणाम नाही झाला तर जमीन काढून घेण्याची कारवाई करण्यात येणार आहे. यामुळे जमीन हडप करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.दीड वर्षे चालणार नोंदींचे कामनिवृत्त तलाठी, तहसीलदार यांच्यासह तज्ज्ञांचा समावेश असलेली ही समिती २३ तालुक्यांतील जमीन कोणत्या देवाच्या नावे आहे, ती किती एकर आहे, सध्या कोणाकडून कसली जाते, जमिनीचा वापर नेमका कोणत्या कारणासाठी केला जातो, परस्पर विक्री झाली आहे का, अतिक्रमण झाले आहे का, कोणती बेकायदेशीर कामे त्यावर केली जातात, ही सगळी माहिती पुराव्यानिशी देवस्थानला नोंदी व अहवालाच्या रूपात सादर करील. हे काम दीड वर्ष चालेल.असे आहेत जमिनींचे गैरव्यवहारकुळांकडून जमिनींची परस्पर विक्रीबेकायदेशीररीत्या शेती४०० सागवानी झाडांची कत्तलशासनदरबारी चुकीची कागदपत्रे सादर करून जमिनी स्वत:च्या नावावर करून घेणेबेकायदा बॉक्साईट उत्खननजमिनीवर प्लॉट पाडून विक्री, अतिक्रमणवर्षानुवर्षे खंड न भरणेजमिनीवर राष्ट्रीयीकृत बँकांची कर्जे

टॅग्स :Templeमंदिरkolhapurकोल्हापूर