खडकेवाड्यात अपक्षांची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:26 IST2021-01-19T04:26:01+5:302021-01-19T04:26:01+5:30

म्हाकवे : खडकेवाडा (ता. कागल) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत दोन अपक्षांनी बाजी मारत प्रमुख पक्षांच्या नेत्यांना धक्का दिला आहे. ...

Independent bet in Khadkewada | खडकेवाड्यात अपक्षांची बाजी

खडकेवाड्यात अपक्षांची बाजी

म्हाकवे : खडकेवाडा (ता. कागल) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत दोन अपक्षांनी बाजी मारत प्रमुख पक्षांच्या नेत्यांना धक्का दिला आहे. येथे प्रमुख पक्षांचे चारही नेते एकत्र होते. डाव्या पक्षांची विचारधारा असणारे आणि निवडणुकीत जाहीरनाम्याचे हँडवेल आणि भित्तीपत्रिका वगळता इतर बाबींसाठी एकही रुपया खर्च करणार नाही, असा निर्धार केलेले बाबूराव अप्पा मेटकर हे विजयी झाले, तर योगेश जयसिंग साबळे या अपक्ष उमेदवारानेही बाजी मारली. खडकेवाडा ग्रामपंचायतीच्या ११ जागांसाठी निवडणूक लागली होती. यामध्ये मंडलिक, मुश्रीफ व दोन्ही घाटगे गटनेत्यांनी निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. मात्र, उमेदवारी देण्यावरून मतभिन्नता झाली. त्यामुळे आठ जणांनी अपक्ष अर्ज दाखल केले. उर्वरित तीन जागा बिनविरोध निघाल्या होत्या. मंडलिक गटाचे गटनेते नंदकुमार घोरपडे यांचे चिरंजीव हर्षवर्धन पाटील यांचा योगेश साबळे यांनी, तर मुश्रीफ गटाचे प्रमुख मकबूल मकानदार यांचे चिरंजीव राज महम्मद यांचा मेटकर यांनी पराभव केला.

Web Title: Independent bet in Khadkewada