शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानग्रस्त कृषीपंपांसाठी जिल्ह्याला १३.८४ कोटींची स्वतंत्र तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 15:53 IST

महापूरकाळात नुकसान झालेल्या कृषीपंपांना भरपाईपोटी कोल्हापूर जिल्ह्यासाठी १३ कोटी ८४ लाख रुपये दिले जातील. येत्या अर्थसंकल्पात त्यासाठी स्वतंत्र तरतूद करण्यास अर्थमंत्र्यांना सांगू, असे आश्वासन राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी राज्य इरिगेशन फेडरेशनच्या शिष्टमंडळाला दिले तसेच वीजबिले ‘महावितरण’ने स्वत: दुरूस्त करून द्यावेत, असेही आदेश मंत्र्यांनी दिले.

ठळक मुद्देऊर्जामंत्र्यांचे इरिगेशन फेडरेशनच्या शिष्टमंडळाला आश्वासनपालकमंत्री सतेज पाटील यांच्या पुढाकाराने विधानभवनात बैठक

कोल्हापूर : महापूरकाळात नुकसान झालेल्या कृषीपंपांना भरपाईपोटी कोल्हापूर जिल्ह्यासाठी १३ कोटी ८४ लाख रुपये दिले जातील. येत्या अर्थसंकल्पात त्यासाठी स्वतंत्र तरतूद करण्यास अर्थमंत्र्यांना सांगू, असे आश्वासन राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी राज्य इरिगेशन फेडरेशनच्या शिष्टमंडळाला दिले तसेच वीजबिले ‘महावितरण’ने स्वत: दुरूस्त करून द्यावेत, असेही आदेश मंत्र्यांनी दिले.पालकमंत्री सतेज पाटील यांच्या पुढाकाराने झालेल्या या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याने मदतीचा मार्ग मोकळा झाला आहे. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील-किणीकर, प्रताप होगाडे, आर. जी. तांबे, बाबासाो पाटील- भुयेकर यांच्यासह ऊर्जासचिव असिमकुमार गुप्ता, संचालक सतीश चव्हाण यांच्यासह ‘महावितरण’चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.बैठकीत महापूर कालावधीतील चुकीची बिल आकारणी रद्द करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. वीजपुरवठा तीन महिने खंडित असतानाही बिले आली आहेत. ती बिले पूर्णपणे रद्द करावीत, अशी मागणी करण्यात आली. त्यावर मंत्री राऊत यांनी या कालावधीत आलेली सर्व कृषीपंपधारकांची बिले त्या ग्राहकांना वीज वितरण कार्यालयात न बोलावता ‘महावितरण’ने तत्काळ दुरूस्त करून द्यावेत, असे आदेश दिले; तसेच संपूर्ण वीज बिलमाफीचे आश्वासन दिले.महावितरण कंपनीने फिडर इनपूट व फिडरवरील जोडभाराधारे बिलिंग करावे, खऱ्या वीज वापरानुसार बिल व आकारणीबद्दलही मंत्री राऊत यांनी सूचना केल्या. चुकीची व रिडिंग न घेता वीज बिले देऊ नये, असेही सांगितले. एच.व्ही.डी.एस योजनेतंर्गत असणाºया कृषीपंपांना पूर्वीप्रमाणेच एल.टी.लाईनवरून वीज कनेक्शन द्यावे, असे आदेशही ‘महावितरण’ला दिले.वीज दरआकारणीबाबत लवकरच बैठकसर्वच सहकारी पाणीपुरवठा संस्थांना एच.टी व एल.टी यांना १ रुपये १६ पैसे वीजदर करणे व सहकारी पाणीपुरवठा संस्थांच्या नावावरील दंडीत व व्याजआकारणी रक्कम कमी करण्याबाबत ‘महावितरण’कडून सविस्तर माहिती घेऊन प्रा. एन. डी. पाटील व इरिगेशन फेडरेशनची लवकरच बैठक बोलावून तोडगा काढू, असेही मंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केले. 

 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पkolhapurकोल्हापूर