सिद्धनेर्ली ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:24 IST2021-01-23T04:24:49+5:302021-01-23T04:24:49+5:30
सिद्धनेर्ली : सिद्धनेर्ली (ता. कागल) येथील ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीने एकहाती सत्ता मिळवली आहे. १५ पैकी ११ जागांवर विजय ...

सिद्धनेर्ली ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर
सिद्धनेर्ली : सिद्धनेर्ली (ता. कागल) येथील ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीने एकहाती सत्ता मिळवली आहे. १५ पैकी ११ जागांवर विजय मिळवत सत्तांतर घडविले आहे. यामध्ये मुश्रीफ गटाचे ८ ,मंडलिक गटाचा १ आणि संजय घाटगे गटाचे २, तर विरोधी भाजपचे ४ असे उमेदवार निवडून आले आहेत.
गावात राजे गटाचे वर्चस्व असताना यावेळी मुश्रीफ गटाने आपले वर्चस्व स्थापन केले आहे. यावेळी महाविकास आघाडी स्थापन करून सिद्धनेर्ली ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीने आपली सत्ता आणली आहे.
विजयी उमेदवार असे- दत्तात्रय पाटील, संदीप पाटील, मनोहर लोहार, दशरथ हजारे, कल्याणी कुरणे, वनीता घराळ, कुसुम मेटील, संगीता पोवार, रेखा मगदूम, वर्षा आगळे, रत्नप्रभा गुरव, युवराज पाटील, अमर पाटील, उज्वला पोवार, विद्या कांबळे.
निकालानंतर विजयी उमेदवारांनी प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या.