शित्तुर-वारुण ग्रामपंचायतीत सत्तांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:21 AM2021-01-21T04:21:22+5:302021-01-21T04:21:22+5:30

सतीश नांगरे लोकमत न्यूज नेटवर्क शित्तूर-वारुण : शित्तूर-वारुण या अत्यंत चुरशीने झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेने आपला भगवा झेंडा फडकावत ...

Independence in Shittur-Varun Gram Panchayat | शित्तुर-वारुण ग्रामपंचायतीत सत्तांतर

शित्तुर-वारुण ग्रामपंचायतीत सत्तांतर

googlenewsNext

सतीश नांगरे

लोकमत न्यूज नेटवर्क

शित्तूर-वारुण : शित्तूर-वारुण या अत्यंत चुरशीने झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेने आपला भगवा झेंडा फडकावत सत्तांतर केले. साऱ्या तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या व ‘कांँटे की टक्कर’ झालेल्या या दुरंगी लढतीत ११ पैकी ०७ जागा मिळवत शिवसेनेने या ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. जनसुराज्य, शेतकरी कामगार पक्ष व कॉंग्रेस या सत्ताधारी आघाडीला अवघ्या चार जागांवर समाधान मानावे लागले आहे.

आमदार डॉ. विनय कोरे व माजी आमदार सत्यजित पाटील यांचे गट प्रामुख्याने एकमेकांसमोर उभे होते. या निवडणुकीत जनसुराज्य पक्षाला काँग्रेस व शेतकरी कामगार पक्षाचे, तर शिवसेनेला राष्ट्रवादीचे बळ मिळाले होते. पाच अपक्ष उमेदवारांनी या निवडणुकीत उडी घेतल्याने रंगत वाढली होती. मात्र एकाही अपक्ष उमेदवाराला उल्लेखनीय कामगिरी करता आली नाही.

गतवेळी शिवसेनेला सत्तेपासून रोखण्यात जनसुराज्य, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी व कॉंग्रेस यांच्या आघाडीला यश आले होते. त्या पराभवाचा वचपा काढत यावेळी नेमके तेच चित्र उलटे करण्यात शिवसेनेला चांगलेच यश आले. गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामांच्या जोरावर सत्तारूढ आघाडीने कालिका ग्रामविकास परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून या निवडणुकीत मते मागितली होती. मात्र यावेळी त्यांना नाकारत शिवसेनेच्या युवा तरुणांनी मोट बांधलेल्या कालिकामाता ग्रामविकास परिवर्तन पॅनलमधून उभ्या राहिलेल्या उमेदवारांच्या बाजूने मतदार राजांनी आपला कौल दिला व सत्तांतर घडवून आणले.

विजयी उमेदवार

शिवसेना :

- लक्ष्मण मारुती पाटील

- विद्या धनाजी सुतार

- कल्पना शामराव पाटील

- नीता अशोक पाटील

- जयवंत राजाराम डपडे

- पल्लवी सुभाष पाटील

- वर्षा विकास झेंडे

जनसुराज्य :

- गणपती साधू धामणकर -किरण संभाजी पाटील

- उज्ज्वला सुधीर मांडवकर

- सिद्धार्थ आनंदा कांबळे

Web Title: Independence in Shittur-Varun Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.