शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी कर्मचारी २६ जानेवारीपासून बेमुदत संपावर, याआधीही महाराष्ट्र शासनाला दिली होती नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 13:58 IST

इसीबी कार्यक्रमाचे नोव्हेंबर २०२१ पासूनचे पैसे मिळालेले नाहीत, ते त्वरित मिळावेत. मोबाइल रिचार्ज मिळालेला नाही

कोल्हापूर : आपल्या विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी २६ जानेवारीपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. या संपाची नोटीस आणि मागण्यांचे निवेदन सोमवारी संघटनेच्या वतीने शुभांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील यांना देण्यात आले.इसीबी कार्यक्रमाचे नोव्हेंबर २०२१ पासूनचे पैसे मिळालेले नाहीत, ते त्वरित मिळावेत. मोबाइल रिचार्ज मिळालेला नाही, तो मिळावा. अंगणवाडी सेविका मदतनीस यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन वेतनश्रेणी व सामाजिक सुरक्षा लागू करावी, तसेच त्यांच्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे शासन जिल्हा परिषद सेवेत सामावून घ्यावे, पोषण ट्रॅकरमधील ऑनलाइन काम योग्य पद्धतीने करता येण्यासाठी शासनाने ताबडतोब चांगल्या क्षमतेचे नवीन मोबाइल किंवा टॅब देईपर्यंत पोषण ट्रॅक्टर कामाची सक्ती करू नये, माहिती भरण्यासह सर्व कामकाज मराठीतून असणारा निर्दोष ॲप उपलब्ध करून द्यावे, लाभार्थ्यांच्या आधार करण्याची जोडणी केली नाही तरी त्यांना आहारापासून वंचित ठेवू नये, उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे, अशा विविध मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. याआधीही महाराष्ट्र शासनाला या संपाची नोटीस दिली असून, जर याबाबत काहीही हालचाली झाल्या नाहीत तर २६ जानेवारीपासून बेमुदत काम बंद करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरagitationआंदोलन