कोरोना रुग्णांचे डिस्चार्ज वाढले, मृत्यूही कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:31 IST2021-07-07T04:31:29+5:302021-07-07T04:31:29+5:30
कोल्हापूर : शहर आणि जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत २०१७ जणांना डिस्चार्ज दिले. एकूण २४ जणांचा मृत्यू झाला. नव्याने १७७६ ...

कोरोना रुग्णांचे डिस्चार्ज वाढले, मृत्यूही कमी
कोल्हापूर : शहर आणि जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत २०१७ जणांना डिस्चार्ज दिले. एकूण २४ जणांचा मृत्यू झाला. नव्याने १७७६ जणांना कोरोनाची लागण झाली. सर्वाधिक बाधित रुग्ण कोल्हापूर शहरात आहेत.
कोरोना रुग्णसंख्येतील वाढ कायम आहे. आरोग्य प्रशासनाने आरटीपीसीआरच्या चाचणीत वाढ केली आहे. यामुळे बाधित रुग्णांचा शोध लवकर लागत आहे. यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ दिसत असल्याचे आरोग्य प्रशासनाचे म्हणणे आहे. आजरा, हातकणंगले, कागल, पन्हाळा, करवीर, शिरोळ तालुक्यातील रुग्णसंख्या कमी होत नसल्याचे चित्र आहे. चोवीस तासांत मृत झालेल्यात सहा जण दीर्घ आजारी होते. १३ जण ६० वर्षांवरील होते. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर पहिल्या ४८ तासांत तिघांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूची संख्या २४ असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणत ८९.४ टक्के आहे.
चौकट
कोरोनाने मृत्यू झालेल्या शहरातील परिसराचे तर तालुकानिहाय गावांची नावे अशी :
कोल्हापूर शहर : यादवनगर, राजारामपुरी, लक्ष्मीपुरी, शिवाजी पेठ राजाराम चौक
शाहूवाडी : सोनुर्ले, चरण
गडहिंग्लज : अर्जुनवाडी, गडहिंग्लज
हातकणंगले : किणी
शिरोळ : शिरोळ, निमशिरगाव, जयसिंगपूर
आजरा : आर्दाळ, पोळगाव
करवीर : पाचगाव, कुडीत्रे, सांगरूळ, चिंचवाड
राधानगरी : पुगांव दोन
हातकणंगले : इचलकरंजी
पन्हाळा : आमटेवाडी
कागल : कागल