शिरोळ तालुक्यात नद्यांच्या पाणी पातळीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:17 IST2021-06-18T04:17:51+5:302021-06-18T04:17:51+5:30
जयसिंगपूर / नृसिंहवाडी / दत्तवाड : शिरोळ तालुक्यात संततधार पडणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील पंचगंगेसह कृष्णा, वारणा, दुधगंगा नद्यांच्या पाणी पातळीत ...

शिरोळ तालुक्यात नद्यांच्या पाणी पातळीत वाढ
जयसिंगपूर / नृसिंहवाडी / दत्तवाड : शिरोळ तालुक्यात संततधार पडणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील पंचगंगेसह कृष्णा, वारणा, दुधगंगा नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. नृसिंहवाडी येथील कृष्णा व पंचगंगा या दोन नद्यांच्या पाणी पातळीत गेल्या चोवीस तासांत नऊ फुटाने वाढ झाली आहे. त्यामुळे कृष्णा-पंचगंगा संगमावरील संगम मंदिराला पाण्याने वेढा दिला आहे.
वाढलेल्या पातळीमुळे नदीकाठी असलेल्या कुरणात पाणी शिरले असून शेतकरी वर्गाची मोटरी काढण्यासाठी व गवत कापणीसाठी धांदल उडाली आहे. तर काही ठिकाणी जलपर्णीखाली विद्युत मोटरी गेल्या आहेत. कृष्णा नदीपेक्षा पंचगंगा नदीच्या पाण्याला जास्त प्रवाह आहे. तर दुधगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने दत्तवाड-एकसंबा, दतवाड-मलिकवाड व घोसरवाड-सदलगा हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
-------------------
चौकट - प्रांताधिकाºयांकडून पाहणी
प्रांताधिकारी डॉ. विकास खरात व तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे यांनी नृसिंहवाडी येथे भेट देऊन पाणी पातळीची पाहणी केली. यावेळी त्यांनी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पडणारा पाऊस त्यामुळे नागरिकांनी जागरुक राहण्याबाबतच्या सुचना केल्या. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अमोल विभूते उपस्थित होते.
फोटो - १७०६२०२१-जेएवाय-०२, ०३, ०४, ०५, ०६ फोटो ओळ - ०२) शिरोळ येथील पंचगंगा नदीवरील बंधारा पाण्याखाली गेला आहे. (छाया-सुभाष गुरव, शिरोळ) ०३) नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथील संगम घाटावरील संगमेश्वर मंदिराला पाण्याने वेढा दिला आहे. (छाया-प्रशांत कोडणीकर, नृसिंहवाडी) ०४) दुधगंगा नदीवरील दत्तवाड-एकसंबा बंधारा पाण्याखाली गेला आहे. (छाया-मिलिंद देशपांडे, दत्तवाड) ०५) शिरढोण -कुरुंदवाड मार्गावरील पंचगंगा नदीवरील पुलाला जलपर्णी येवून अडकली आहे. (छाया-गणपती कोळी, कुरुंदवाड) ०६) शिरोळ-कुरुंदवाड मार्गावरील ऊस शेतीत अशाप्रकारे पावसाचे पाणी साचले आहे. (छाया-सुभाष गुरव, शिरोळ)