धान्य खरेदीचा वाढला ‘टक्का
By Admin | Updated: April 22, 2015 00:25 IST2015-04-22T00:00:57+5:302015-04-22T00:25:08+5:30
पावसाळ्यातील नियोजन : भाव वधारले, संकेश्वरी मिरची ५० हजार रुपये क्विंटल ’

धान्य खरेदीचा वाढला ‘टक्का
भीमगोंडा देसाई- कोल्हापूर -पावसाळ्यातील नियोजनामुळे धान्य व मिरचीच्या मागणीचा टक्का वाढला आहे. त्यामुळे भाव वधारले आहेत. तरीही खरेदीसाठी लक्ष्मीपुरी धान्य लाईनमध्ये ग्राहकांची गर्दी होत आहे. संकेश्वरी मिरची ५० हजार रुपये क्ंिवटल झाली आहे. धान्य खरेदीची उलाढाल प्रत्येक वर्षी एप्रिल ते मेअखेर वाढलेली असते. या काळात यात्रा, लग्नसराई, वास्तुशांत असे कार्यक्रम असतात. जून ते आॅगस्टअखेर लागणारे धान्य, डाळी, चटणीचे नियोजन केले जाते. सध्या पावसाळ्यासाठी जोरदार धान्य खरेदी सुरू आहे. मिरची कांडपासाठी व पिठाच्या गिरणीत रांगा लागत आहेत. धान्याच्या घाऊक बाजारपेठेला ‘अच्छे दिन’ आले आहेत. धान्यांच्या दरात ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. मागणी ४० टक्क्यांपर्यंत वाढली आहे. यामुळे धान्याची आवक वाढली आहे.
पावसाळ्यातील नियोजनामुळे धान्य खरेदीसाठी गर्दी होत आहे. लग्नसराई व यात्रेचा हंगामही आहे. सर्वच धान्यांची मागणी ३० ते ४० टक्क्यांनी वाढली आहे. ज्वारीपेक्षा गव्हाला उल्लेखनीय पसंती आहे.
- वैभव सावर्डेकर, व्यापारी,
पावसाळ्यात धान्याची खरेदी करावयाची झाल्यास पावसाचा व्यत्यय येत असतो. दर्जेदार धान्यही मिळत नाहीत. त्यामुळे आत्ताच धान्य खरेदी केली आहे.
- नीलिमा कारंडे, एस.एस.सी. बोर्ड परिसर, कोल्हापूर