शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

उसाच्या एफआरपीत वाढ; शेतकऱ्यांचे हित परंतु साखर कारखानदारीचे मरण

By विश्वास पाटील | Updated: June 29, 2023 11:46 IST

चार वर्षात साखरेच्या विक्री दरात वाढ नाही

विश्वास पाटीलकोल्हापूर : केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत आल्यापासून उसाच्या एफआरपीमध्ये १०५० रुपये टनाला वाढ झाली. परंतु साखरेचा विक्री दर वाढवायला मात्र केंद्र सरकार तयार नाही. साखरेचा दर वाढला की महागाई वाढते, असे सरकारला वाटते. त्यामुळे देशातील साखर कारखानदारीने हा दर ३६०० रुपये करण्याची वारंवार मागणी करूनही सरकार ढिम्मच आहे. त्यामुळे मुख्यत: सहकारी साखर कारखानदारीवर मरण ओढवले आहे.केंद्रात मोदी सरकार सत्तेत आले तेव्हा एफआरपी २१०० रुपये होती. ती आगामी वर्षासाठी ३१५० रुपये करण्यात आली. बुधवारीच कृषी मूल्य आयोगाने त्याची घोषणा केली. या दहा वर्षात केंद्राने तब्बल आठ वेळा एफआरपीमध्ये वाढ केली. साखर कारखानदारीच्या इतिहासात साखरेचा विक्री दर केंद्र शासनाने कधीच निश्चित केलेला नव्हता. परंतु भाजप सरकारने जून २०१८ मध्ये प्रथमत: तो निश्चित केला आणि टनास २९०० रुपयांच्या खाली साखर विकता येणार नाही, असे निर्बंध घातले. इतिहासाने नोंद घ्यावी इतका चांगला हा निर्णय आहे. साखर कारखानदारीच्या अस्तित्वाचाच प्रश्न उभा राहिला असताना केंद्राने हा विक्री दर निश्चित केला. लगेच फेेब्रुवारी २०१९ मध्ये हाच दर ३१०० रुपये केला. मागच्या चार वर्षात एफआरपी ४०० रुपयांनी वाढली आणि साखरेचा विक्री दर मात्र जुनाच आहे. तो किमान ३६०० रुपये करावा, यासाठी देशातील साखर कारखानदारीच्या सर्वच शिखर संस्थांनी केंद्राकडे वारंवार पाठपुरावा केला. परंतु केंद्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. केंद्राचे हे धोरण कारखानदारीच्या मुळावर उठणारे आहे. कारण साखरेला चांगला दर मिळाल्याशिवाय एफआरपी देणे शक्य नाही. त्या दबावाने कारखानदारी कर्जाच्या ओझ्याखाली जात आहे.

झळ नाही..मध्यमवर्गीय ग्राहकाला महागाईची झळ बसू नये, यासाठी केंद्र सरकार हा दर वाढवत नसल्याचे समर्थन चुकीचे आहे. कारण सर्वसाधारण एका कुटुंबाला महिन्याला ५ किलो म्हणजे वर्षाकाठी ६० किलो साखर लागते. त्याच्या दरात किलोस दहा रुपये वाढ केली तरी त्याचे बजेट ६०० रुपयांपेक्षा जास्त वाढत नाही. या ग्राहकाचे एका वेळच्या हॉटेलिंगचे बिलही याच्या तिप्पट असते.

कृषिमूल्य आयोगाच्या शिफारशीनुसार, ज्यावेळी एफआरपी वाढविल्यावर साखरेच्या विक्री दरातही वाढ करणे जरुरीचे आहे. परंतु तसे घडलेले नाही. त्यामुळे कारखान्यांना तोटा सहन करावे लागत आहेत. - पी.जी.मेढे, साखर उद्योगाचे तज्ज्ञ

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने